ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणेकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. गायमुख ते कापूरबावडी मार्गावर ठाणे मेट्रो मार्गाची चाचणी यशस्वी पार पडली आहे, या मार्गावर डिसेंबरपर्यंत मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, त्यांनी येत्या डिसेंबरपासून ठाणे मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यात आल्याची माहिती मिळाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी एक्स या प्लॅटफॉर्मवरून ठाणेकरांना माहिती दिलीये.
https://www.prahaar.in/2026/09/15/farewell-to-the-1-1-2-day-ganpati-today-ganesh-idols-immersed-amidst-the-resounding-beats-of-dhol-tasha-and-teary-eyes/
शेअर केलेल्या पोस्टमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी! गायमुख ते कापूरबावडी या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, डिसेंबरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडले आहे. या मार्गामुळे गायमुख, कासारवडवली, वाघबीळ, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कापूरबावडी आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल. ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.”
ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी! गायमुख ते कापूरबावडी या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, डिसेंबरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडले आहे.
या मार्गामुळे गायमुख, कासारवडवली, वाघबीळ, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन,… pic.twitter.com/XsPtAfDt81
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) September 12, 2026
ठाण्यात वाहतुकीचे प्रमाण वाढत असताना आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांची मागणी वाढत असतानाच, ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जर डिसेंबरपासून मेट्रो सेवा सुरू झाली तर, हा मेट्रो मार्ग वेगाने विकसित होत असलेल्या निवासी भागांमधून ठाण्याच्या प्रमुख भागांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो. सरनाईक म्हणाले की, ही यशस्वी चाचणी डिसेंबरपर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी सुद्धा ठाणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मेट्रोचे ट्रायल रन घेण्यात आली. ठाणेकरांच्या सेवेमध्ये मेट्रो आल्यास हजारो ठाणेकरांना ट्रॅफिकमधून दररोज करावा लागणारा प्रवास कायमचा बंद होईल. पिक अवरच्या काळामध्ये मोठ्या संख्येने गाड्यांची आणि नोकरदारांची एकच गर्दी असते.
https://www.prahaar.in/2026/09/15/lalbaugcha-raja-media-stopped-despite-passes/