मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्या आता केवळ शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र न राहता रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी केंद्रे म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे, असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. (Jaykumar Rawal)
राज्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी १ हजार ठिकाणी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील सुमारे २०० कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार असून, युवकांना रोजगार, व्यवसाय आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (Jaykumar Rawal)
https://www.prahaar.in/2026/09/15/government-ready-for-discussion-on-legal-demands-of-jarange/
कृषी क्षेत्रातून रोजगाराच्या मोठ्या संधी
अन्नप्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग, विपणन आणि निर्यात या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. महाराष्ट्राचा शेतमाल देशभर तसेच जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी सक्षम प्रक्रिया आणि पुरवठा व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे रावल यांनी सांगितले. (Jaykumar Rawal)
रोजगार महाकुंभासाठी बाजार समित्यांनी उद्योग व रोजगारदात्यांना सहभागी करून घ्यावे, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि रोजगाराच्या संधींची व्यापक प्रसिद्धी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
https://www.prahaar.in/2026/09/15/bjp-national-president-nitin-nabin-to-visit-mumbai-tomorrow/
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही बाजार समित्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. (Jaykumar Rawal)
“कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे केवळ मालाची खरेदी-विक्रीची जागा नाही, तर ती रोजगार आणि व्यापाराचे मोठे केंद्र आहे,” असे जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले. (Jaykumar Rawal)