Home महाराष्ट्र नाशिक Nashik News : निलंबनाच्या कारवाईविरुद्ध नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, प्रांताधिकाऱ्याविरोधात 800 तलाठी अन् ग्रामसेवक एकवटले

Nashik News : निलंबनाच्या कारवाईविरुद्ध नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, प्रांताधिकाऱ्याविरोधात 800 तलाठी अन् ग्रामसेवक एकवटले

0
Nashik News : निलंबनाच्या कारवाईविरुद्ध नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, प्रांताधिकाऱ्याविरोधात 800 तलाठी अन् ग्रामसेवक एकवटले

Nashik News : नाशिक जिल्ह्यात प्रांताधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा आरोप करत तब्बल 800 तलाठी (Talathi) आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे, जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फेरफार नोंदी आणि महसूल कामकाजात अनियमितता असल्याचे तपासणीत उघड झाल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इगतपूरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी इगतपुरी तालुक्यातील एक मंडलाधिकारी व पाच तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. वेतनवाढही रोखली होती. या कारवाईविरोधात तलाठ्यांनी मिळून पवन दत्ता यांच्याविरोधात एल्गार पुकारला असून निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/15/nashik-a-fake-whatsapp-business-account-created-in-the-name-of-the-nashik-district-collector/

…तर कामबंद आंदोलनाचा इशारा

प्रांत अधिकारी पवन दत्ता यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप तलाठी महासंघाने केला आहे. प्रांताधिकार्‍यांनी बेकादेशीर निलंबन केल्याचा आरोप तलाठी महासंघाने केला आहे. प्रशासकीय सेवेतील आपल्या विविध मागण्यांसाठी 15 तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी एकत्र येत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध जवळपास 800 तलाठी व ग्रामविकास अधिकारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Nashik District Collector’s Office) धरणे आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास बुधवार पासून कामबंद आंदोलन केलं जाईल असा इशाराही तलाठी महासंघाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here