Home ब्रेकिंग न्यूज Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोलींची नावे, सतीश सालियान यांचा सीबीआयकडे जबाब

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोलींची नावे, सतीश सालियान यांचा सीबीआयकडे जबाब

0
Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोलींची नावे, सतीश सालियान यांचा सीबीआयकडे जबाब
Names of Aditya Thackeray Dino Morea and Sooraj Pancholi surface in the Disha Salian case Disha Dad Satish Salian records statement with the CBI

मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, दिशाचे वडील सतीश सालियान यांनी तपास यंत्रणेकडे दिलेल्या जबाबात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पांचोली यांच्यासह काही व्यक्तींची नावे दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, रिया चक्रवर्ती, सचिन वाझे यांच्यासह इतरांच्या भूमिकेबाबतही कागदपत्रांसह माहिती दिल्याचे सतीश सालियान यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

https://www.prahaar.in/2026/09/15/using-the-youth-for-political-purposes-cost-the-congress-dearly/

या प्रकरणाच्या तपासासाठी सुरुवातीला विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. मात्र, एसआयटीकडून अपेक्षित तपास झाला नसल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला. तब्बल दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर त्यांनी ॲड. नीलेश ओझा यांच्या माध्यमातून मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तेथून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वकिलांच्या सल्ल्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेतही सुमारे दीड वर्ष गेल्यानंतर उच्च न्यायालयाने प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सतीश सालियान यांनी आपल्या मुलीवर अन्याय करणाऱ्या व्यक्तींची नावे तपास अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. “मी सीबीआयला दिलेल्या यादीत आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली आणि त्यांच्या अंगरक्षकांची नावे दिली आहेत,” असा दावा त्यांनी केला. तसेच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याच्या आरोपांबाबतही त्यांनी तपास यंत्रणेला माहिती आणि कागदपत्रे दिल्याचे म्हटले आहे.

https://www.prahaar.in/2026/09/15/will-the-cbi-summon-aaditya-thackeray-for-questioning-in-the-disha-salian-case-fir-registered-following-high-court-directives/

दिशा सालियान यांच्या मृत्यूनंतर गेल्या सहा वर्षांत या प्रकरणावरून विविध दावे, आरोप आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला औपचारिक तपासाची दिशा मिळाली आहे. सतीश सालियान यांनी दिलेला जबाब, त्यात नमूद केलेली नावे, उपलब्ध कागदपत्रे, यापूर्वी झालेला तपास आणि इतर पुरावे सीबीआयकडून तपासले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत्यूच्या परिस्थितीबाबत नेमके काय घडले आणि सतीश सालियान यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, सतीश सालियान यांनी सीबीआयच्या तपासावर विश्वास व्यक्त केला आहे. “सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू करणे हे आमच्या लढ्यातील सर्वात मोठे यश आहे. आता न्यायाचे दरवाजे उघडले आहेत. उशिरा का होईना, आम्हाला नक्की न्याय मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेली सहा वर्षे आपण या दिवसाची वाट पाहत होतो आणि आता तपास सुरू झाल्याने दिशाला न्याय मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here