Home ब्रेकिंग न्यूज Karad News: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंधूचे निधन

Karad News: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंधूचे निधन

0
Karad News: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंधूचे निधन

कराड: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या चुलत बंधूंचं निधन झालं आहे. अधिकराव आण्णासाहेब चव्हाण असं त्यांचं नाव असून त्यांच्या निधनाने कराड परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिकराव चव्हाण यांचं निधन १४ सप्टेंबर २०२६ रोजी, सकाळी अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने चव्हाण कुटुंबीयांसह कराड आणि परिसरामध्ये दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कै. अधिकराव चव्हाण यांच्यावर कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. कै. अधिकराव चव्हाण यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, कराड येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/09/15/new-record-at-navi-mumbai-airport-boeing-777f-arrives-with-90-tonnes-of-imported-cargo/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here