मुंबई: हिंदू भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांपासून तिचे रक्षण करण्यासाठी वराह देवाचे स्मरण आणि पूजन आवश्यक आहे. हिंदू समाजाने आपल्या सणांच्या माध्यमातून संघटित राहून हिंदू राष्ट्र अधिक भक्कम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी केले. घोडपदेव येथील हनुमान मंदिरात वराह जयंतीनिमित्त आयोजित महाआरतीनंतर ते बोलत होते. (Maharashtra News)
https://www.prahaar.in/2026/09/13/overwhelming-response-to-the-maharashtra-governments-maharashtra-state-best-public-ganeshotsav-mandal-competition/
वराह जयंतीच्या निमित्ताने हिंदू बांधव, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि संत मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी राणे यांनी वराह देव हा भगवान विष्णूचा चौथा अवतार असल्याचे सांगत हिंदू भूमीच्या रक्षणाशी त्याचे महत्त्व विशद केले. “ज्याप्रमाणे वराह देवाने राक्षसापासून पृथ्वीचे रक्षण केले, त्याचप्रमाणे हिंदू भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांपासून तिचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले. (Nitesh Rane News)
एका दिवसापुरती वराह जयंती साजरी न करता, जेव्हा जेव्हा हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहिले जाईल, तेव्हा मोठ्या उत्साहात वराह जयंती साजरी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. वराह देवामध्ये अशा शक्तींना रोखण्याची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवासह हिंदूंचे सर्व सण नाचत-गाजत आणि उत्साहाने साजरे झाले पाहिजेत, असेही राणे म्हणाले. हिंदू म्हणून एकत्र येणे आणि संघटित राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी हिंदू कार्यकर्त्यांचे कौतुक केले. “हिंदू समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर त्याला कसे उत्तर द्यायचे हे महाराष्ट्रातील आणि देशातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे,” असेही ते म्हणाले. (Minister Nitesh Rane)
https://www.prahaar.in/2026/09/13/30-year-old-woman-brutally-murdered-in-baramati-body-found-in-a-pool-of-blood-in-the-bedroom/
हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना जशासतसे उत्तर देणार
महाआरतीनंतर माध्यमांशी बोलताना राणे यांनी वराह जयंतीचे सनातन धर्मातील महत्त्व अधोरेखित केले. वराह देव हा विष्णूचा चौथा अवतार असून हिंदू भूमीच्या रक्षणासाठी त्याचे पूजन केले जाते. त्यामुळे वराह जयंतीच्या निमित्ताने हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते आणि संत एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. “जेव्हा जेव्हा हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहिले जाईल, तेव्हा तेव्हा वराह जयंती साजरी करण्याची भूमिका आमची आहे. ही जयंती एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ३६५ दिवस उत्साहाने साजरी केली पाहिजे,” असे राणे यांनी सांगितले. हिंदू सण हे समाजाला एकत्र आणणारे आणि संघटित करणारे असावेत. गणेशोत्सव असो किंवा अन्य हिंदू सण, सर्वांनी एकत्र येऊन ते उत्साहाने साजरे करावेत आणि हिंदू समाजाला एकत्र ठेवणे हे आपले परमकर्तव्य मानावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर धर्माकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची मुभा आपल्या धर्मात असल्याचे राणे यांनी सांगितले.