एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर येतात. अशातच ब्युटिशियन सोनिता शर्मा यांच्या मृत्यूच्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील गूढ आता आणखी वाढले असून, घटनेच्या वेळी पाइप व्यावसायिक दीपक खंडेलवाल सोनिता यांच्यासोबत हॉटेलच्या खोलीत उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दीपक फरार असून, या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Crime News)
https://www.prahaar.in/2026/09/12/chhatrapati-sambhajinagar-crime-pestering-for-marriage-harassment-over-the-phone-and-threats-at-home-young-woman-takes-drastic-step-driven-to-despair-by-mental-harassment/
घटनेशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये काही जण सोनिता यांना हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या गाडीत बसवताना दिसत आहेत. दीपकने हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याला सोबत येण्यास सांगितले होते; मात्र त्याने नकार दिला. त्यानंतर दीपक सोनिता यांना रुग्णालयात घेऊन गेला. यापूर्वी त्याने हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. दीपक सोनिता यांना हॉटेलमधून बाहेर घेऊन जाताना आणि त्यानंतर रुग्णालयात नेतानाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. (Crime News)
रूम नंबर १०१मध्ये नेमकं काय घडलं?
सोनिता शर्मा हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर सुमारे तासाभराने पाइप व्यावसायिक दीपक खंडेलवाल हा देखील रूम नंबर १०१मध्ये आला. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे त्यानंतर सुमारे ४० मिनिटे एकाच खोलीत होते. त्यानंतर दीपकने हॉटेल कर्मचाऱ्यांना सोनिता बेशुद्ध झाल्याची माहिती दिली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Crime News)
https://www.prahaar.in/2026/09/12/crime-news-the-wedding-took-place-but-the-bride-never-reached-her-in-laws-home-after-dropping-the-groom-off-on-the-way/
अतिरिक्त डीसीपी अमरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक इंदूरचा रहिवासी असून तो विवाहित आहे. पाल्डा परिसरात त्याचा पाइपचा व्यवसाय आहे. घटनेनंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.
पोलिसांनी सोनिता यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून तपास सुरू केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात विषबाधेची शक्यता नाकारण्यात आली आहे. सध्या पोलीस आत्महत्या आणि हत्या या दोन्ही शक्यतांच्या अनुषंगाने तपास करत आहेत. (Crime News)