– राज्य शासनाकडून आदेश जारी; मुलाखतीचे इन-कॅमेरे चित्रिकरण बंधनकारक
मुंबई : राज्यातील अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवरील भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गांतील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन मान्यता प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र ‘नॉन-टीचिंग वैयक्तिक मान्यता पोर्टल’ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीला गती मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra School Recruitment)
https://www.prahaar.in/2026/09/12/over-1500-devotees-set-off-for-konkan-via-the-namo-express-and-special-buses/
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आवश्यक असलेली वैयक्तिक मान्यता आणि शालार्थसंबंधी कार्यवाही या स्वतंत्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित तसेच अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर पदांसाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र, रिक्त पदांवरील भरतीपूर्वी पदोन्नती आणि अनुशेषाच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित रिक्त पदांपैकी ८० टक्के जागा सरळसेवेने भरण्यास परवानगी मिळणार आहे. (Maharashtra School Recruitment)
https://www.prahaar.in/2026/09/12/sweet-news-for-mumbaikars-no-need-to-worry-about-the-naivedya-for-bappa-mumbaikars-can-now-get-steamed-and-fried-modaks-delivered-right-to-their-doorstep/
भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी उमेदवारांच्या मुलाखतीचे इन-कॅमेरा चित्रिकरण करणे आणि त्याची नोंद जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे राहणार आहे. नियुक्तीनंतर सुरुवातीची तीन वर्षे मानधनावर सेवा द्यावी लागणार आहे. दरम्यान, २८ मे २०२५पूर्वी झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची वैयक्तिक मान्यता आणि शालार्थसंबंधी कार्यवाहीही याच पोर्टलच्या माध्यमातून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे संकेतस्थळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून, संबंधित शाळांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती त्यावर सादर करावी लागणार आहे. (Maharashtra School Recruitment)