Home महाराष्ट्र नवी मुंबई Highway Traffic : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्यांचा ओघ; सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Highway Traffic : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्यांचा ओघ; सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

0
Highway Traffic : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्यांचा ओघ; सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

नवी मुंबई: गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरामधून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रचंड गर्दीमुळे शनिवारी सायन-पनवेल महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली. कळंबोली सर्कलजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले, ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलग आलेल्या सुट्ट्या आणि उत्सवामुळे एकाच मार्गावर तीन-तीन लेनमधून गाड्या धावत असल्याने सकाळपासूनच वाहतूक विस्कळीत झाली होती.

या वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक विशेष वाहतूक व्यवस्थापन योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत कोन फाटा ते कळंबोली परिसराचा समावेश असून, वाढती कोंडी लक्षात घेता काही वाहने उरण फाटा आणि अटल सेतूच्या दिशेने वळवली जात आहेत. तसेच, पनवेल आणि कळंबोलीमधील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून सुमारे ५० अतिरिक्त वाहतूक वॉर्डनची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून पोलिसांना गर्दीचे नियोजन करणे सोपे जाईल.

https://www.prahaar.in/2026/09/12/dhule-crime-fathers-drunken-rage-spirals-out-of-control-attacks-two-little-daughters-directly-with-a-glass-bottle/

उत्सवाच्या काळात हा मार्ग अत्यंत व्यस्त राहत असल्याने, मुंबईहून कोकणाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here