Home देश Indoor News : इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत ब्युटीशियनचा संशयास्पद मृत्यू; ४० मिनिटे सोबत असणारा ‘तो’ व्यक्ती कोण ?

Indoor News : इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत ब्युटीशियनचा संशयास्पद मृत्यू; ४० मिनिटे सोबत असणारा ‘तो’ व्यक्ती कोण ?

0
Indoor News : इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत ब्युटीशियनचा संशयास्पद मृत्यू; ४० मिनिटे सोबत असणारा ‘तो’ व्यक्ती कोण ?

इंदोर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indoor News) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित हॉटेलमधील रूम नंबर १०१ मध्ये एका ब्युटीशियन महिलेचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. सोनाली शर्मा असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हॉटेलच्या रूम नंबर १०१ मध्ये काय घडले ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनाली शर्मा इंदोरमधील एका हॉटेलमध्ये थांबली होती. ती खोलीत गेल्यानंतर सुमारे एका तासाने दीपक खंडेलवाल नावाचा एक व्यावसायिक तिच्या खोलीत दाखल झाला. तो साधारण ४० मिनिटे सोनालीसोबत खोलीत होता. त्यानंतर तो अचानक खोलीबाहेर आला आणि सोनाली आत बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना दिली.

उपचारापूर्वीच मृत्यू, पोलिसांचा प्राथमिक अंदाज

हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने सोनालीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू गळफासामुळे झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल (Post-mortem report) आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात; संशयिताचा शोध सुरू

पोलीस तपासाला गती देण्यासाठी पोलिसांनी हॉटेलमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) आपल्या ताब्यात घेतले आहेत. फुटेजमध्ये सोनालीला कारमधून रुग्णालयात घेऊन जातानाचे दृश्य कैद झाले आहे. सोनाली बेशुद्ध असल्याचे सांगणारा दीपक खंडेलवाल हा सध्या पोलिसांच्या संपर्कात नसून त्याचा शोध सुरू आहे. त्याची कसून चौकशी केल्यानंतरच खोलीत त्या ४० मिनिटांत नेमके काय घडले, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here