Home ब्रेकिंग न्यूज Bhandara Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघात; आयशर ट्रकला ट्रॅक्सची धडक, 8 मजुरांचा जागीच मृत्यू

Bhandara Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघात; आयशर ट्रकला ट्रॅक्सची धडक, 8 मजुरांचा जागीच मृत्यू

0
Bhandara Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघात; आयशर ट्रकला ट्रॅक्सची धडक, 8 मजुरांचा जागीच मृत्यू
accident

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्स गाडीची जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅक्समधील 8 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये छत्तीसगडमधील मजुरांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ( Bhandara Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील काही मजूर ट्रॅक्स गाडीने नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. पिंपळगाव परिसरातील एका पेट्रोल पंपावरून आयशर ट्रक महामार्गावर येत होता. याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या ट्रॅक्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्स थेट आयशर ट्रकवर जाऊन आदळली. (Accident News)

https://www.prahaar.in/2026/09/11/fraud-involving-the-lure-of-jobs-abroad-3-accused-arrested/

दोन्ही वाहनांमध्ये झालेली धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्स गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 8 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नॅशनल हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. (Truck Accident)

गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here