Home क्राईम Bank Robbery Case : नागपुरात फिल्मी स्टाईल बँक लूट; कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून….लाखांची रोकड लांबवली, सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद

Bank Robbery Case : नागपुरात फिल्मी स्टाईल बँक लूट; कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून….लाखांची रोकड लांबवली, सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद

0
Bank Robbery Case : नागपुरात फिल्मी स्टाईल बँक लूट; कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून….लाखांची रोकड लांबवली, सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद
Filmy-style bank robbery in Nagpur; chili powder thrown into employees' eyes... lakhs in cash stolen

नागपूर: नागपूर शहरातून एका बँक लुटीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत एका अज्ञाताने कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली. मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि पोलिसांच्या तडकाफडकी कारवाईमुळे आरोपी अवघ्या काही वेळातच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.(Bank Robbery Case)

बँकेची वेळ संपल्यानंतर आरोपीचा प्रवेश

ही घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. बँकेचे कामकाज संपल्यानंतर सूरज बोरकर नावाचा आरोपी चेहऱ्यावर कापड बांधून बँकेच्या शाखेत शिरला. त्याने अचानक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्यास सुरुवात केली, ज्यामुळे बँकेत एकच गोंधळ उडाला. या गोंधळाचा फायदा घेत आरोपीने कर्मचाऱ्यांच्या हातातील ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावली आणि पळ काढला.(Filmy-style bank robbery in Nagpur)

https://www.prahaar.in/2026/09/11/second-list-of-355614-farmers-for-loan-waiver-announced/

कर्मचाऱ्यांचा पाठलाग आणि पोलिसांची कारवाई

आरोपी बँकेतून बाहेर पडताच कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करत त्याचा धाडसाने पाठलाग केला. तसेच तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही वेगाने सूत्रे हलवत बँकेपासून काही अंतरावरच आरोपीला जेरबंद केले. पोलिसांनी त्याच्याकडून लुटलेली संपूर्ण ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून, त्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे.(Bank Robbery Case)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

आधीच केली होती रेकी?

प्राथमिक तपासानुसार, आरोपीने या गुन्ह्यापूर्वी बँकेची रेकी केली असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एटीएममध्ये पैसे कधी जमा केले जातात, याची माहिती मिळवूनच त्याने बँकेजवळ दबा धरून योग्य संधीची वाट पाहिली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.(Filmy-style bank robbery in Nagpur)

https://www.prahaar.in/2026/09/11/major-relief-from-railways-for-ganeshotsav-386-ganpati-special-trains-announced-with-4-additional-trains-added-for-the-konkan-region/

CCTV मध्ये कैद झाला थरार

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे. यामध्ये आरोपी चेहऱ्यावर कापड बांधून बँकेत प्रवेश करताना, बॅगेतून मिरची पूड काढून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातफेकताना आणि त्यानंतर कर्मचारी सैरावैरा धावताना स्पष्टपणे दिसत आहेत. सक्करदरा पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.(Bank Robbery Case)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here