Home ब्रेकिंग न्यूज Rakhi Sawant : राखी सावंतविरोधात थेट एनआयएकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

Rakhi Sawant : राखी सावंतविरोधात थेट एनआयएकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

0
Rakhi Sawant : राखी सावंतविरोधात थेट एनआयएकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत तिच्या अतरंगी वक्तव्यांमुळे, सोशल मीडियावरील चर्चांमुळे आणि पॅप्ससमोरच्या विविध करामतींमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता तिचं नाव एका वेगळ्याच वादात अडकले आहे. यावेळी हे प्रकरण थेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. राखी सावंतविरोधात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIAकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Rakhi Sawant)

तक्रार नेमकी कशाबाबत?

तक्रारदाराने राखीच्या अलीकडच्या काही वक्तव्यांपासून ते तिच्या परदेशातील दौऱ्यांपर्यंतच्या विविध बाबींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावरील तिची वक्तव्ये, माध्यमांसमोर केलेली विधाने, परदेशातील काही हालचाली तसेच सीमेपलीकडील काही व्यक्ती आणि संस्थांशी असलेले कथित संपर्क संशयास्पद असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. (Rakhi Sawant)

https://www.prahaar.in/2026/09/11/celebrating-social-sensitivity-in-the-film-world-vamika-john-and-raveena-honoured-with-cine-kind-awards/

NIAकडे तक्रार का करण्यात आली?

राखीच्या काही वक्तव्यांमध्ये आणि हालचालींमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तपासाची गरज असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे या सर्व बाबींची सखोल चौकशी करून त्यामागील नेमके तथ्य समोर आणावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.(Rakhi Sawant)

राखीच्या कोणत्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह?

राखीने सोशल मीडियावर केलेली काही वक्तव्ये, परदेशातील तिचे दौरे, माध्यमांशी संवाद साधताना केलेली विधाने आणि सीमेपलीकडील व्यक्ती किंवा संस्थांशी असलेले कथित संपर्क या सर्व बाबी तक्रारदाराने तपासाच्या कक्षेत आणल्या आहेत. (Rakhi Sawant)

दरम्यान, NIAकडे तक्रार दाखल होणे म्हणजे राखी सावंतवरील आरोप सिद्ध झाले आहेत, असे नाही. या प्रकरणातील सत्यता आणि तक्रारीतील दाव्यांमध्ये तथ्य आहे की नाही, हे संबंधित यंत्रणेच्या तपासानंतरच स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here