महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राज्यातील विविध भागांत वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान बदलण्याची शक्यता असून, काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
११ सप्टेंबरला विदर्भ-मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता
11 सप्टेंबर रोजी नाशिक घाट परिसरासह परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी हवामान आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. IMDच्या उपविभागीय अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात या काळात वादळी पावसाची शक्यता कायम आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/central-government-announces-new-rules-for-the-e-commerce-sector-consumer-protection-to-be-strengthened-revised-rules-effective-from/
१२ सप्टेंबरला अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर
12 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे. धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांत वादळी पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि ठाण्यासाठी IMDच्या शहरनिहाय अंदाजात 12 सप्टेंबरला विजांसह वादळी वारे येण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे. ठाण्यात या दिवशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने झोताचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/deputy-chief-minister-eknath-shinde-receives-statesmanship-award-british-investors-urged-to-come-to-maharashtra/
१३ आणि १४ सप्टेंबरला कुठे पाऊस?
13 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या भागांत हवामान बदलण्याची शक्यता आहे.
14 सप्टेंबरला नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. IMDच्या उपविभागीय अंदाजानुसार कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 13 आणि 14 सप्टेंबरला जोरदार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/restrictions-on-social-media-use-for-children-under-18-petition-in-the-supreme-court/
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहणे टाळावे. शक्य असल्यास सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनीही विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम करणे टाळावे.
पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी IMDचे ताजे अपडेट आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.