Home महाराष्ट्र ठाणे Dombivali Local Train : डोंबिवलीहून सुटलेल्या गर्दीच्या लोकल ट्रेनमधून महिला थेट ट्रॅकवर पडली अन्…व्हिडिओ व्हायरल

Dombivali Local Train : डोंबिवलीहून सुटलेल्या गर्दीच्या लोकल ट्रेनमधून महिला थेट ट्रॅकवर पडली अन्…व्हिडिओ व्हायरल

0
Dombivali Local Train : डोंबिवलीहून सुटलेल्या गर्दीच्या लोकल ट्रेनमधून महिला थेट ट्रॅकवर पडली अन्…व्हिडिओ व्हायरल
Dombivali Local Train

ठाणे : डोंबिवली स्थानकातून (Dombivali Railway Station) सकाळी ७:५६ वाजता सुटलेल्या तुफान गर्दीच्या लोकल ट्रेनमधून एक महिला प्रवासी अचानक रेल्वे रुळावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत महिलेला केवळ किरकोळ दुखापत झाली असून मोठी दुर्घटना टळली आहे.

दिवा ते मुंब्रा दरम्यान घडली घटना (Diva-Mumbra) 

ही घटना दिवा आणि मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान घडली. सकाळी ७:५६ ची लोकल असल्याने ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. सिग्नल मिळाल्यामुळे गाडी काही वेळासाठी थांबली असता, गर्दीच्या दबावामुळे आणि तोल गेल्याने ही महिला थेट रेल्वे रुळावर खाली पडली.

https://www.prahaar.in/2026/09/10/anna-bansode-appointed-as-a-trustee-of-the-peoples-education-society-resolves-to-carry-forward-dr-babasaheb-ambedkars-educational-legacy/

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

महिला रुळावर पडल्याचे दिसताच ट्रेनमधील आणि आसपासच्या प्रवाशांमध्ये एकाच वेळी प्रचंड घबराट पसरली. मात्र, प्रसंगावधान राखून इतर प्रवाशांनी लगेचच मदतीसाठी पुढाकार घेतला. महिला सुखरूप असल्याचे आणि तिला फक्त किरकोळ दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला.

लोकलमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मध्य रेल्वेवर सकाळी पीक अव्हर्समध्ये ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.