मुंबई : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नंदूरबार, धुळे, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज पावसाच्या सरींसह मेघगर्जना होऊ शकते. नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather)
राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण
राज्यातील इतर भागांमध्ये आज आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ऊन आणि ढगाळ वातावरण असे मिश्र चित्र पाहायला मिळू शकते. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ( Monsoon Update)
https://www.prahaar.in/2026/09/07/priority-given-to-quality-education-through-the-chala-shalet-jayuya-lets-go-to-school-campaign-school-education-minister-dadaji-bhuse/
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री
मध्य उत्तर प्रदेश आणि परिसरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीच्या आसपास समुद्रसपाटीपासून सुमारे 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण गुजरातपासून कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत आणि तेलंगणापासून मन्नारच्या आखातापर्यंतही कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. (Weather Update)
हवामान विभागाची माहिती
दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक 35.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये सर्वात कमी 17.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सध्या कोकणात नैऋत्य मोसमी वारे सामान्य आहेत. मात्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मोसमी वारे तुलनेने कमजोर आहेत. त्यामुळे राज्यात काही भागांत पाऊस, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असे चित्र राहण्याची शक्यता आहे. ( Maharashtra Rain)