पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायावर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळांजवळ गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना तेथून जाण्यास सांगितल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात पोलिस शिपाई अक्षय बांबल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय बांबल हे पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर होते. त्यावेळी रेल्वे रुळांच्या जवळ काही तरुण गांजा सेवन करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना बांबल यांनी तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, यावरून त्यांच्यात वाद झाला. (Pune News)
https://www.prahaar.in/2026/09/08/late-night-deliberations-at-the-chief-ministers-varsha-residence-regarding-the-maratha-reservation-issue/
वाद वाढल्यानंतर कोयत्याने हल्ला
ड्युटी बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरच अशाप्रकारे हल्ला झाल्याने पुणे रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादांचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. (Pune Police)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यात नेमके किती जण सहभागी होते, तसेच आरोपींची ओळख पटली आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपासातून या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील समोर येणार आहे. (Pune Police Attack)