एकाकडे बंदूक आढळल्याने खळबळ
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (NMACC) परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पंतप्रधान उपस्थित असलेल्या व्हीव्हीआयपी परिसरातून पोलिसांनी एका बनावट अधिकाऱ्याला त्याच्या बंदुकधारी सुरक्षारक्षकासह ताब्यात घेतले आहे. स्वतःला पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) वरिष्ठ अधिकारी सांगणारा हा युवक थेट सुरक्षेचे कडे भेदून आत घुसल्याने केंद्रीय यंत्रणांसह मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे.
बनावट आयडी कार्ड अन् पीएमओ अधिकाऱ्याचा आव
https://www.prahaar.in/2026/09/08/15-day-special-traffic-and-power-block-in-titwala-suburban-and-mail-express-train-schedules-affected/
रोहन पारेख नावाचा २४ वर्षीय तरुण एनएमएसीसी परिसरातील व्हीव्हीआयपी भागात अत्यंत आत्मविश्वासाने वावरत होता. तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना त्याच्या वागण्या-बोलण्याचा संशय आल्याने त्यांनी त्याची अडवणूक करून विचारपूस केली. त्यावेळी त्याने स्वतःची ओळख थेट ‘पीएमओ’ अधिकारी म्हणून सांगत एक ओळखपत्र दाखवले. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने दाखवलेले पंतप्रधान कार्यालयाचे आयडी कार्ड पूर्णपणे बोगस आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
खाजगी बॉडीगार्ड आणि सुरक्षेत मोठी त्रुटी
गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी सुरू
पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील या गंभीर सुरक्षा त्रुटीनंतर स्थानिक पोलिसांसह केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तातडीने हरकतीत आल्या आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण घटनेचा तपास आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवण्यात आला आहे. आरोपी रोहन पारेख याने हे बनावट ओळखपत्र कुठे तयार केले, त्याच्यासोबत बंदुकधारी व्यक्ती आणण्यामागचा मुख्य हेतू काय होता आणि तो कोणाच्या सांगण्यावरून अथवा मदतीने आतपर्यंत पोहोचला, या सर्व बाजूंचा गुन्हे शाखा सध्या कसून तपास करत आहे. दरम्यान, दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी करून बनावट ओळखपत्र, कार्यक्रमस्थळी प्रवेश आणि शस्त्र यांचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास केला जाणार आहे.