– अमित ठाकरे यांना कन्यारत्न; ‘शिवतीर्थ’वर आनंदाचे वातावरण
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात सोमवारी आनंदाचे आगमन झाले. त्यांचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे दुसऱ्यांदा बाबा झाले असून, त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ठाकरे कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन झाल्याने ‘शिवतीर्थ’वर आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांच्यावर दुसऱ्यांदा आजोबा होण्याचा योग आला आहे. (Raj Thackeray)
https://www.prahaar.in/2026/09/07/election-of-79-corporators-challenged-dispute-over-caste-certificates-criminal-records-and-asset-declarations/
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी झाला. या दाम्पत्याला यापूर्वी कियान हा मुलगा आहे. आता त्यांच्या कुटुंबात मुलीचे आगमन झाले आहे. अमित ठाकरे दुसऱ्यांदा वडील झाल्याने ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमित ठाकरे हे मनसेच्या राजकारणात सक्रिय असून, २०२४ची विधानसभा निवडणूक त्यांनी माहीम मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. उबाठा गटाच्या महेश सावंत यांनी माहीम मतदारसंघातून विजय मिळवला होता. अमित ठाकरे यांच्या प्रचारात मिताली बोरुडे यांनीही सहभाग घेतला होता. (Raj Thackeray)
https://www.prahaar.in/2026/09/07/promotion-of-eco-friendly-ganeshotsav-eco-friendly-ganesha-idol-painting-festival-at-mantralaya-on-september-8/
दरम्यान, अमित ठाकरे हे अलीकडेच पुण्यातील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कार्यक्रमामुळे चर्चेत आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, सध्या राजकीय चर्चांपासून दूर त्यांच्या कुटुंबात आलेल्या या गोड बातमीमुळे ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. (Raj Thackeray)