https://www.prahaar.in/2026/09/07/mary-kom-enters-the-bigg-boss-20-arena-priyanka-chopra-sends-special-best-wishes/
मूळचा केरळमधील वायनाड येथील असलेला निसार अरोथ इब्राहिम (निसार वायनाड) हा त्याच्या बहारदार स्टेज शो आणि विशेषतः माप्पिल्लापाट्टू गाण्यांच्या सादरीकरणासाठी गल्फ देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. ऑगस्ट महिन्यात तो विविध संगीत कार्यक्रमांसाठी दुबईत गेला होता. शनिवारी दुपारी त्याला अचानक तीव्र ताप आल्यामुळे तातडीने येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अवघ्या काही वेळातच त्याची प्रकृती खालावली आणि त्याने तिथेच प्राण सोडले.(Popular Singer Death)
https://www.prahaar.in/2026/09/07/misbehavior-with-doctors-will-not-be-tolerated-eknath-shinde-takes-stern-action-rahul-gharat-suspended/
वैद्यकीय अहवालांनुसार, त्याच्या मृत्यूचे मुख्य कारण ‘ॲसिडोसिस’ (Acidosis) आणि ‘सेप्टिसेमिया’ (Septicemia) असल्याचे समोर आले आहे. शरीरात तीव्र संसर्ग (इन्फेक्शन) पसरल्यामुळे त्याचे महत्त्वाचे अवयव निकामी झाले आणि रक्तातील आम्ल प्रमाण वाढल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
https://www.prahaar.in/2026/09/07/everyone-must-work-together-to-secure-a-new-identity-for-indian-pomegranates-in-the-global-market-agriculture-minister-dattatray-bharne/
उदित नारायण यांच्या आवाजाशी कमालीचे साम्य असल्यामुळे आणि त्यांच्यासोबत बहरीनच्या मंचावर गाण्याची संधी मिळाल्यामुळे तो संगीत वर्तुळात चर्चेत आला होता. त्याच्या अचानक निधनामुळे दुबईतील संगीतप्रेमी आणि चाहत्यांना तीव्र धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून, त्याच्या पार्थिवावर केरळमधील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. एका होतकरू गायकाचा अशा प्रकारे अचानक अंत झाल्याने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.(Popular Singer Death)