Mumbai : मुंबईतील जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरकाम करणाऱ्या एका महिलेच्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर ओळखीच्याच २७ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी लगेचच कारवाई करत नराधम मजुराला पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत बेड्या ठोकल्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/07/delhi-govt-cracks-whip-5-mcd-officials-suspended-after-satya-niketan-building-collapse/
जोगेश्वरी परिसरात राहणारी ३८ वर्षीय महिला घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. गुरुवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास तिची चार वर्षांची चिमुकली घराबाहेर एकटीच खेळत होती. आरोपीनं इथेच तिला गाठलं. याच परिसरात मजुरीचे काम करणारा २७ वर्षीय अनिलकुमार याने मुलगी एकटी असल्याचे पाहून तिला फुस लावून आपल्या खोलीवर नेलं.
https://www.prahaar.in/2026/09/07/fire-breaks-out-in-a-flat-at-rajtara-society-in-thane-45-residents-safely-evacuated/
आरोपीने आधी चिमुकलीशी अश्लील चाळे केले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी घाबरलेल्या चिमुकलीने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, आईने क्षणाचाही विलंब न लावता आंबोली पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार केली.
https://www.prahaar.in/2026/09/07/nashik-crime-saddam-shaikh-scores-a-hat-trick-of-extortion-cases/
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ भादंवि आणि पोक्सो (POCSO) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. त्याला दिंडोशीतील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.