https://www.prahaar.in/2026/09/07/major-setback-for-sugar-cosmetics-valuation-plummets-from-%e2%82%b92700-crore-to-%e2%82%b9600-crore-vineeta-singh-says-the-movie-isnt-over-yet/
दरवाढीमागे नेमकं कारण काय?
- APMCमध्ये कांद्याचा घाऊक दर ₹52–53 किलोवर पोहोचला आहे.
- किरकोळ बाजारात ग्राहकांना ₹65–70 किलो मोजावे लागत आहेत.
- पावसामुळे पिकाचे नुकसान आणि चांगल्या प्रतीच्या कांद्याची कमतरता ही दरवाढीमागची प्रमुख कारणे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवी मुंबई APMCमध्ये कांद्याची आवक सुरू असली तरी त्यातील मोठ्या प्रमाणातील कांदा ओला किंवा खराब दर्जाचा असल्याने चांगल्या प्रतीच्या कांद्याचा पुरवठा तुलनेने कमी झाला आहे. २ सप्टेंबरला नाशिक आणि लासलगाव भागातून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आला होता; मात्र त्यातील अनेक पोत्यांमध्ये ओला आणि खराब कांदा आढळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दर्जेदार कांद्याच्या भावावर दबाव वाढला आहे.(Onion Price Mumbai)
४ सप्टेंबरला APMCमध्ये सुमारे १५० ट्रक कांद्याची आवक झाली होती. मात्र आवक असूनही दर्जेदार मालाची उपलब्धता मर्यादित असल्याने दर कमी झाले नाहीत. नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होईपर्यंत दर चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.(APMC)
https://www.prahaar.in/2026/09/07/major-reforms-in-recruitment-exams-on-the-cards-governments-high-level-task-force-to-directly-interact-with-candidates-across-the-state/
केंद्राच्या बफर स्टॉकचा फायदा ग्राहकांना कधी?
कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा ₹35 किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. २८ ऑगस्टपासून पहिल्या दहा दिवसांत १७ शहरांमध्ये सुमारे ४ हजार टन बफर कांद्याची विक्री करण्यात आली. मात्र देशातील सरासरी किरकोळ दरात अद्याप अपेक्षित घट झालेली नाही.(APMC Market)
मग कांद्याचे दर पुन्हा कमी होणार कधी? नवीन आवक वाढते का, पावसामुळे झालेले नुकसान किती आहे आणि चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात किती प्रमाणात उपलब्ध होतो, यावर आगामी काळातील दर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहेत.