Home ताज्या घडामोडी Nashik : उन्नत नाशिक अभियानाचा ११ वा टप्पा, भोसला कॅम्पसमध्ये ‘कुंभ युवा संवाद’

Nashik : उन्नत नाशिक अभियानाचा ११ वा टप्पा, भोसला कॅम्पसमध्ये ‘कुंभ युवा संवाद’

0
Nashik : उन्नत नाशिक अभियानाचा ११ वा टप्पा, भोसला कॅम्पसमध्ये ‘कुंभ युवा संवाद’

Nashik : नाशिकला स्वच्छ, सुंदर, हरित व पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सुरू असलेल्या ‘उन्नत नाशिक अभियान’अंतर्गत ‘मिशन ग्रीन मान्सून’चा ११ वा टप्पा बुधवार (दि. ९) रोजी भोसला मिलिटरी कॉलेज कॅम्पसमध्ये राबविण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता ‘५ हजार देशी वृक्ष वाटप’ व ‘कुंभ युवा संवाद’ कार्यक्रम होणार आहे.

https://www.prahaar.in/2026/09/07/major-action-by-delhi-police-hariram-bansal-the-absconding-owner-involved-in-the-satya-niketan-tragedy-arrested-in-rajasthan/

५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून व प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात ५ हजारांहून अधिक विद्यार्थी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडा प्रशिक्षक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडापटू व पर्यावरणप्रेमी सहभागी होणार आहेत.सुप्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री योगिता माळसे यांची विशेष उपस्थिती राहणार असून, पर्यावरण व सामाजिक उपक्रमांत योगदान देणाऱ्या मान्यवरांसह युवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (रील स्टार्स) यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

युवकांच्या माध्यमातून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ घराघरांत पोहोचविण्यात येणार आहे.मिशन ग्रीन मान्सून’च्या १० टप्प्यांमध्ये झालेल्या कामाचा आढावा घेऊन योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी संघटना व मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यांत नाशिकमधील इतर नामांकित शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून युवा संवाद व वृक्षलागवड मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

https://www.prahaar.in/2026/09/07/youth-attacks-a-woman-her-daughter-and-a-shopkeeper-in-netivali-kalyan-east-following-an-argument-over-the-use-of-abusive-language-cctv-footage-surfaces/

५५ हजार २७५ देशी वृक्षांची लागवड व वाटप

मोहिमेच्या १० टप्प्यांपर्यंत नंदिनी नदीकाठ, दऱ्याई माता परिसर, सिन्नर एमआयडीसी, एकलहरे, गंगापूर धरण व कालवा परिसर यांसह विविध ठिकाणी एकूण ५५ हजार २७५ देशी वृक्षांची लागवड व वृक्षवाटप करण्यात आले आहे.

‘हरित कुंभ’साठी युवाशक्तीचे प्रबोधन

आगामी सिंहस्थ कुंभमेळा ‘हरित कुंभ’ आणि ‘स्वच्छ कुंभ’ म्हणून देशात आदर्श ठरावा, यासाठी युवाशक्तीचे प्रबोधन केले जाणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘नशामुक्त भारत’ साकारण्यासाठी युवकांमध्ये व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाबाबत संवाद साधला जाणार आहे.” असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.