पुणे : पुणे-सातारा महामार्गाजवळ भोर तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास हत्येची एक थरारक घटना घडली आहे. ४ ते ५ जणांच्या टोळक्याने एका २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याची निर्घृण हत्या केली. सागर रामचंद्र पालवे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भोर परिसर आणि सिंहगड रस्त्यावरील रांजे गावामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune News)
https://www.prahaar.in/2026/07/26/pune-crime-pune-shaken-two-shooting-incidents-in-24-hours-police-commissioner-takes-a-major-decision/
गाढ झोपेत असताना अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला
ही घटना कोंढणपूर फाटा ते सिंहगड रस्त्यावरील रांजे गावच्या हद्दीत रविवारी पहाटे ३ वाजता घडली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास अचानक हवेत गोळीबार झाल्याचा मोठा आवाज आला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता सागर पालवे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाची चक्रे फिरवली. (Pune Crime News)
https://www.prahaar.in/2026/09/07/attempt-to-assault-a-young-woman-under-the-pretext-of-returning-money-shocking-incident-in-pune/
आर्थिक वादातून हत्या
प्राथमिक तपासात हा खून आर्थिक व्यवहारातील वादातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक केतन मचले आणि सागर कोंढाळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (Pune Murder News)
दरम्यान, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातही पूर्ववैमनस्यातून एका २० वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची दुसरी घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pune Shooting News)