Pakistan Team Crisis: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) एका निर्णयामुळे सध्या क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी राष्ट्रीय संघातील खेळाडूंचे मोबाईल फोन पीसीबीने आपल्या ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी पत्रकार अंबर अली यांनी याबाबत दावा केला असून, इंग्लंडविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना संपेपर्यंत खेळाडूंचे फोन बोर्डाच्या ताब्यातच राहतील असे त्यांनी सांगितले आहे. ( Pakistan vs England Test)
https://www.prahaar.in/2026/09/05/harmanpreet-kaurs-historic-record-in-the-india-pakistan-match-first-cricketer-to-captain-150-t20i-matches/
सर्व खेळाडूंचे मोबाईल जप्त
खेळाडूंचे मोबाईल जमा करण्यामागचे नेमके कारण काय आहे, याबाबत पीसीबीने अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे एखाद्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा संशय आहे की बोर्डाला भ्रष्टाचाराची माहिती मिळाली आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये मोबाईल वापरास बंदी असते. मात्र, संपूर्ण दौऱ्यादरम्यानच फोन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने क्रिकेटविश्वात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणी अद्याप तरी कोणत्याही खेळाडूवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले नाहीत. संपूर्ण संघाचे फोन जमा केले आहेत की केवळ ठराविक खेळाडूंचे, हेदेखील अजून स्पष्ट झालेले नाही. या कारवाईमागील मुख्य कारण पीसीबीच्या अधिकृत निवेदनानंतरच समोर येण्याची शक्यता आहे.