पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ( Ketan Agrawal Murder) पोलीस तपासादरम्यान एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhary) यांनी या हत्येच्या कटासाठी एकापु तिसऱ्या व्यक्तीची मदत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेच्या तब्बल 79 दिवसांनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी बीडचा मूळ रहिवासी असलेल्या रितेश हंगे याला शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/09/06/dharashiv-wrestler-ashwini-paul-suicide-case-second-child-dies-during-treatment-all-four-in-suicide/
रितेश चेतन आणि सियाच्या संपर्कात होता
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रितेश हंगे हा बालेवाडीतील एका खासगी कंपनीत काम करतो आणि तो चेतन व सियाचा वर्गमित्र आहे. पोलिसांना संशयितांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअॅप चॅटची पडताळणी करताना रितेशचा या प्रकरणातील सहभाग आढळला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रितेश हा चेतन आणि सियाच्या सतत संपर्कात होता. हत्येपूर्वी तसेच केतनच्या मृत्यूनंतरही आरोपींनी रितेशशी संपर्क साधला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन आणि सियाने रितेशला 18 जून रोजी लोहगड येथे सोबत येण्यास सांगितले होते, परंतु त्याने जाण्यास नकार दिला होता. हत्येच्या संपूर्ण कटाची कल्पना असूनही रितेशने ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलीस या संपूर्ण कटाचा सखोल तपास करत असून हत्येमागील नेमका हेतू आणि रितेशची यातील भूमिका स्पष्ट करण्याचे काम सुरू आहे.