Home क्राईम Crime News : माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून पतीकडून मारहाण? २३ वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल…

Crime News : माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून पतीकडून मारहाण? २३ वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल…

0
Crime News : माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून पतीकडून मारहाण? २३ वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल…

छत्रपती संभाजीनगर : लग्नासाठी माहेरच्यांनी तब्बल १२ लाख रुपये खर्च केल्यानंतरही चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या मागणीवरून विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाला अवघे पाच महिनेही पूर्ण झाले नसताना पतीकडून मारहाण आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्याच्या आरोपातून निकिता ऋषिकेश वाकळे (२३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सुरेवाडी, जाधववाडी येथे घडली. आत्महत्येपूर्वी निकिता यांनी आईला फोन करून ‘तुझी काळजी घे’, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. (Crime News)

या घटनेनंतर निकिता यांच्या अंत्यविधीदरम्यान हडको एन-११ येथील स्मशानभूमीत माहेर आणि सासरच्या नातेवाइकांमध्ये वाद झाला. आरोप-प्रत्यारोप वाढल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आणि दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

निकिता यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हसूल पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती ऋषिकेश सोमीनाथ वाकळे (२६), सासू रेखा सोमीनाथ वाकळे, सासरे सोमीनाथ कचरू वाकळे (५३), दीक्षा तांबे (२९), दीर सुमित सोमीनाथ वाकळे (२०), अनिता दामोदर पवार (३५) आणि मंदा हरिदास दारकुंडे (३३), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी ऋषिकेश वाकळे याला ताब्यात घेतले आहे. (Crime News)

https://www.prahaar.in/2026/09/06/%e2%82%b916-5-lakh-fraud-under-the-pretext-of-securing-iit-admission-powai-police-bust-racket-supplying-fake-sim-cards/

चारचाकीसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा

निकिता यांचे वडील गणेश अर्जुन पठारे हे बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथे राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, निकिता आणि ऋषिकेश यांचा चार ते पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबीयांनी मोठा खर्च केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच निकिताला सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यास सुरुवात झाल्याचा आरोप आहे.

चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत, अशी मागणी पती ऋषिकेश करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. लग्नात आधीच मोठा खर्च झाल्याने निकिताने आणखी पैसे आणण्यास नकार दिला. त्यानंतर पतीने तिच्यासोबत मारहाण केली, तर घरगुती कारणांवरून सासरच्या अन्य मंडळींकडूनही मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. (Crime News)

https://www.prahaar.in/2026/09/06/major-shift-at-isro-nine-employee-unions-unite-seek-written-clarification-on-privatization/

आईला फोन करून म्हणाल्या, ‘तुझी काळजी घे’

सासरच्या मंडळींकडून होत असलेला त्रास वाढत गेल्याने निकिताने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी निकिता यांनी आईला फोन करून ‘तुझी काळजी घे’, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

निकिता या मूळच्या देव पिंपळगाव येथील रहिवासी असून त्या बीएस्सीचे शिक्षण घेत होत्या. त्यांचा विवाह जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथे राहणाऱ्या ऋषिकेश वाकळे याच्याशी झाला होता. ऋषिकेश हा शहरातील एका धर्मादाय रुग्णालयात ‘ब्रदर’ म्हणून काम करतो. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच निकिताला सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी हसूल पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, तक्रारीतील आरोपांची चौकशी केली जात आहे. (Crime News)