Home ब्रेकिंग न्यूज BMC Engineers Transfer : महापालिकेतील प्रमुख अभियंत्यांच्या बदल्या

BMC Engineers Transfer : महापालिकेतील प्रमुख अभियंत्यांच्या बदल्या

0
BMC Engineers Transfer : महापालिकेतील प्रमुख अभियंत्यांच्या बदल्या
BMC

पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण आणि इमारत परिरक्षण विभागात फेरबदल

मुंबई (विशेष प्रतिनिधी):
महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी गटातील प्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख अभियंता मेहुल पेंटर आणि संजय कुमार पांडव यांच्या खात्याची खांदे पालट करतानाच उपप्रमुख अभियंता विकास सामंत यांना बढती देत त्यांच्याकडे आरोग्य पायाभूत कक्षाच्या इमारत बांधकाम विभागाच्या प्रमुख अभियंता पदाचा विद्यमान पदासोबत अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/05/identify-the-reasons-behind-water-related-complaints-and-interact-with-the-locals-after-the-complaints-have-been-resolved/

प्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करताना मेहुल पेंटर( प्रमुख अभियंता) यांच्याकडे सध्या असलेले इमारत परिरक्षण, आरोग्य पायाभूत कक्ष हे काम काढून त्यांच्यावर प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पर्जन्य जल वाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता संजयकुमार पांडव यांची बदली आता त्यांच्याकडे प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपप्रमुख अभियंता (स्थापत्य) विकास सामंत यांच्याकडे या पदा व्यतिरिक्त प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण), आरोग्य पायाभूत कक्ष या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कुणाची वर्णी कुठल्या स्थानांवर

मेहुल पेंटर : प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या)

संजय कुमार पांडव :प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प)

विकास सामंत : उपप्रमुख अभियंता (स्थापत्य), अतिरिक्त कार्यभार प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण), आरोग्य पायाभूत कक्ष