पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बिबवेवाडी परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाविरोधात परवानगीपेक्षा अधिक लाऊडस्पीकर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंडळाची साऊंड सिस्टिमही जप्त केली आहे. (Dahi Handi 2026)
पोलिसांच्या माहितीनुसार, दहीहंडी कार्यक्रमासाठी मंडळाला लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या परवानगीच्या अटींचे उल्लंघन करत मंडळाने 4 बेस आणि 4 टॉपऐवजी तब्बल 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर लावले. त्यामुळे परिसरात मोठ्या आवाजात ध्वनी प्रदूषण होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. (Pune News)
https://www.prahaar.in/2026/09/05/shocking-thrilling-dahi-handi-event-turns-tragic-in-malad-7-year-old-boy-dies-after-wall-pillar-collapses/
बिबवेवाडी ओटा येथील श्रीकृष्ण मंडळाने दहीहंडी उत्सवासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली होती. मात्र, परवानगीमध्ये दिलेल्या नियमांचे पालन न करता अतिरिक्त साऊंड सिस्टिमचा वापर केल्याचा आरोप आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. (DJ Sound System)
दरम्यान, दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. मोठ्या आवाजात डीजे किंवा लाऊडस्पीकर वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. सण-उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पुण्यात सध्या डीजे आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत असून, उत्सव आणि ध्वनी मर्यादा यावरून वादही सुरू आहे. (Pune Police)