मुंबई : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असून, मंगळवारी झालेल्या वाढीनंतर बुधवारी बाजारात सोन्याच्या दरात मोठी कपात झाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल ₹2,070 ची घसरण झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( Gold Price Today)
24 कॅरेट सोन्याचा दर ₹2,070 ने कमी होऊन प्रति 10 ग्रॅम ₹1,52,020 वर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात ₹1,900 ची घसरण झाली असून, त्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,39,350 इतका झाला आहे. 18 कॅरेट सोन्याचाही दर कमी झाला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/02/a-search-was-conducted-a-complaint-was-lodged-and-finally-the-womans-body-was-found-in-the-elevator-shaft-what-exactly-happened/
24 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम – ₹15,202
8 ग्रॅम – ₹1,21,616
10 ग्रॅम – ₹1,52,020
100 ग्रॅम – ₹15,20,200
22 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम – ₹13,935
8 ग्रॅम – ₹1,11,480
10 ग्रॅम – ₹1,39,350
100 ग्रॅम – ₹13,93,500
18 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम – ₹11,402
8 ग्रॅम – ₹91,216
10 ग्रॅम – ₹1,14,020
100 ग्रॅम – ₹11,40,200
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹15,217 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर ₹13,950 आहे.
वडोदरा आणि अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹15,207, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹13,940 आहे.
दरम्यान, सोन्याच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी खरेदीची संधी ठरू शकते. मात्र, प्रत्यक्ष दागिन्यांच्या किमतीत मेकिंग चार्ज, GST आणि इतर शुल्कांचा समावेश असल्याने अंतिम किंमत यापेक्षा अधिक असू शकते.