Home महाराष्ट्र नाशिक Nashik : काळाचा घाला ! आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

Nashik : काळाचा घाला ! आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

0
Nashik : काळाचा घाला ! आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू
accident

Nashik : सातपूर औद्योगिक वसाहतीतील नीलय मेटल कंपनीसमोर मंगळवारी (दि. १) सकाळी झालेल्या अपघातात ४३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सुजित राजेंद्र गायकवाड असे मृत युवकाचे नाव आहे. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. (Nashik Accident News)

https://www.prahaar.in/2026/09/02/nashik-200-pilgrims-from-nashik-have-returned-safely-from-the-massive-disaster-in-nepal/

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित गायकवाड हे जेलरोड परिसरातील जुना सायखेडा रोड भागात राहत होते. ते एमएनजीएल गॅस कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होते आणि सातपूर विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर आजीच्या निधनामुळे ते अंत्यसंस्कारासाठी घरी निघाले. नीलय मेटल कंपनीसमोरील मारुती मंदिराजवळील उतारावर रस्ता निसरडा असल्याने त्यांची दुचाकी घसरली अन् तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या छोटा हत्ती वाहनाची त्यांना धडक बसली. या अपघातात सुजित यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. (Nashik Accident News)

https://www.prahaar.in/2026/09/02/accident-during-geetanagar-cha-maharaja-arrival-procession-young-girl-critically-injured-after-coming-under-a-2-tonne-trolley/

कुटुंबातील एकमेव कमावता आधार हरपला

सुजित हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या वडिलांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते, तर आईचे कोरोना काळात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि १२ वर्षांची मुलगी आहे. त्यांची पत्नी सहा महिन्यांची गर्भवती आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे गायकवाड कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.