Home क्राईम POCSO arrest Shahapur : ठाण्याच्या शहापूर आदिवासी शाळेत २२ विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सो कायद्यांतर्गत नराधम मदतनीसाला अटक

POCSO arrest Shahapur : ठाण्याच्या शहापूर आदिवासी शाळेत २२ विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सो कायद्यांतर्गत नराधम मदतनीसाला अटक

0
POCSO arrest Shahapur : ठाण्याच्या शहापूर आदिवासी शाळेत २२ विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सो कायद्यांतर्गत नराधम मदतनीसाला अटक
22 girl students molested at a tribal school in Shahapur, Thane; depraved helper arrested under the POCSO Act.

Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी निवासी शाळेत (आश्रम शाळा) अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील २२ विद्यार्थिनींचा विनयभंग आणि अयोग्य स्पर्श केल्याप्रकरणी ३५ वर्षीय स्वयंपाकघरातील मदतनीसाला पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गणपत गवळी असे आरोपीचे नाव असून तो शहापूर तालुक्यातील टेंभे येथील आदिवासी आश्रम शाळेत कामावर होता. इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी असा आरोप केला आहे की, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर ताटं ठेवायला किंवा भांडी धुवायला स्वयंपपाकघरात गेल्यावर गवळी त्यांना वारंवार अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असे.

https://www.prahaar.in/2026/09/01/one-year-extension-granted-for-the-sale-of-loose-edible-oil-decision-taken-at-a-meeting-chaired-by-the-chief-minister/

एका तक्रारीनंतर सत्य बाहेर आले

२४ ऑगस्ट रोजी एका विद्यार्थिनीने धाडस दाखवत शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे गवळीच्या विकृत वर्तनाची तक्रार केली. त्यानंतर एकामागून एक अशा आणखी २१ विद्यार्थिनी पुढे आल्या आणि त्यांनी मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. विद्यार्थ्यांनी याआधी शाळेच्या अधीक्षकांकडेही याबद्दल तक्रार केली होती, परंतु अधीक्षक त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याऐवजी मुलींवरच रागवले असल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे. या प्रकरणी अधीक्षकांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.

आरोपीवर आधीही होता पोक्सोचा गुन्हा

या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याच आरोपीवर २०२४ मध्ये दुसऱ्या एका आदिवासी निवासी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला अटकही करण्यात आली होती.

त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यावर त्याचे निलंबन रद्द करण्यात आले आणि त्याला या नवीन शाळेत पुनर्नियुक्ती देण्यात आली. पूर्वी गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या व्यक्तीला आदिवासी विकास विभागांतर्गत पुन्हा कामावर कसे ठेवले गेले, याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

https://www.prahaar.in/2026/09/01/7-8-gdp-growth-is-an-indicator-of-the-countrys-progress/

प्रशासन आणि पोलिसांची कारवाई

विद्यार्थ्यांच्या ताज्या तक्रारींनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गणपत गवळी याला पोक्सो कायद्याच्या कलमांनुसार अटक केली आहे. शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) कार्यालयाला या नियुक्त्यांवर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. शिक्षण विभागाचे प्रभारी सहायक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बी. आर. जाधव यांनी सांगितले की, आरोपीवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल तसेच त्याचे निलंबन रद्द करून पुनर्नियुक्ती कशी झाली, याचीही कसून चौकशी सुरू आहे.