मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. (NCP Core Committee Meeting)
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते तसेच कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी काळातील पक्षाची वाटचाल, विविध राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. (NCP Core Committee Meeting)
https://www.prahaar.in/2026/08/31/nomadic-and-de-notified-tribes-should-achieve-progress-through-the-power-of-education-dr-neelam-gorhe/
पक्ष अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवरही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. राज्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय वाढवण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. (NCP Core Committee Meeting)
https://www.prahaar.in/2026/08/31/mumbai-water-quality-quality-of-mumbais-water-supply-is-improving-contaminated-water-levels-have-dropped-from-0-46-to-0-28-three-year-data-shows-a-decline/
सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढवून पक्षाला राज्यभरात बळकट करण्याचा निर्धार यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला. आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. (NCP Core Committee Meeting)
