वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ
मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार (१ सप्टेंबर) पासून लागू होणार आहे. प्रवाशांची सोय, मागणी आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करून या वेळापत्रकात सहा नव्या लोकल सेवा सुरु करण्यात येणार आहेत. तसेच दादर-डहाणू रोड थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार असून, एसी लोकलच्या सेवांमध्येही वाढ करण्यात आली आहे. (Western Railway)
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सुधारित वेळापत्रकात एकूण १,४१४ उपनगरीय सेवा सुरू राहतील. दोन अप आणि चार डाउन अशा सहा नव्या सेवा सुरू करण्यात येणार असून, आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी एसी लोकलची संख्या १४५ वरून १४७ करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी एकूण ११६ वातानुकूलित सेवा धावतील. (Western Railway)
https://www.prahaar.in/2026/08/31/jnpa-emerges-as-the-worlds-fastest-growing-container-port/
सहा नव्या स्लो लोकल सेवा
अप दिशेतील नव्या सेवा…
• बांद्रा-चर्चगेट : बांद्रा येथून सकाळी ११.५८ वाजता सुटून दुपारी १२.३० वाजता चर्चगेटला पोहोचेल.
• विरार-बोरिवली : विरार येथून रात्री ११.५१ वाजता सुटून मध्यरात्री १२.२६ वाजता बोरिवलीला पोहोचेल.
डाउन दिशेतील नव्या सेवा…
भायंदर-विरार : सकाळी ७.४६ वाजता सुटणार, बोरिवली-भायंदर : रात्री १०.१४ वाजता सुटणार, बोरिवली-विरार : रात्री १०.५१ वाजता सुटणार, बोरिवली-भायंदर : मध्यरात्री १२.२८ वाजता सुटणार
— Western Railway (@WesternRly) August 31, 2026
दादर-डहाणू रोड थेट लोकल…
प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल म्हणजे दादर ते डहाणू रोड थेट लोकल सेवा सुरु करण्यात आली. सध्या दादर-विरार आणि विरार-डहाणू रोड या सेवा एकत्रित करण्यात येणार आहेत. सुधारित दादरहून सायंकाळी ५.२२ वाजता सुटेल आणि सायंकाळी ७.३० वाजता डहाणू रोडला पोहोचेल. (Western Railway)
विरार–दादर लोकल चर्चगेटपर्यंत वाढवली
विरार-दादर, जी विरारहून सकाळी ८.२३ वाजता सुटते, ती आता चर्चगेटपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. ही गाडी चर्चगेटला सकाळी ९.४८ वाजता पोहोचेल. तसेच विद्यमान दादर-विरार ही सेवा आता चर्चगेटहून सकाळी ९.५२ वाजता सुटून नालासोपारापर्यंत धावेल. विशेष म्हणजे आता दोन विद्यमान नॉन-एसी सेवांचे एसी सेवांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. (Western Railway)
https://www.prahaar.in/2026/08/31/draft-electoral-rolls-for-the-states-assembly-constituencies-published/
महत्वाचे बदल…
चर्चगेट-बोरिवली : चर्चगेटहून सायंकाळी ५.२८ वाजता सुटणारी ही गाडी आता एसी गाडी म्हणून धावेल. बोरिवली-चर्चगेट : बोरिवलीहून सायंकाळी ६.२४ वाजता सुटणारी ही सेवा आता एसी ट्रेन म्हणून धावेल. या दोन्ही सेवांचे मार्ग आणि वेळा पूर्वीप्रमाणेच राहतील. चर्चगेटहून सायंकाळी ६.२२ व ७.०५ वाजता सुटणाऱ्या लोकल आता बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत. चर्चगेट-बोरिवली सकाळी १०.२४ वाजता सुटणारी एसी स्लो लोकल आता गोरेगावपर्यंतच धावेल. ही गाडी आता चर्चगेट-गोरेगाव एसी स्लो अशी करण्यात आली आहे. तसेच बोरिवली-चर्चगेट एसी लोकलऐवजी आता गोरेगाव-चर्चगेट एसी स्लो सेवा सुरू राहील. ही सेवा गोरेगावहून सकाळी ११.३९ वाजता सुटेल. प्रवाशांनी नवीन वेळापत्रक, लोकलच्या वेळा व थांब्यांमधील बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे. (Western Railway)