चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी टीव्हीके (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षाच्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ आहे. तामिळनाडूमध्ये ‘विजय फॉर प्राइम मिनिस्टर’ (विजय पंतप्रधान व्हावेत) मोहीम सुरू आहे. यामुळे काँग्रेस पक्षात अस्वस्थता पसरली आहे. (Tamil Nadu Politics)
आघाडीत राहूनही टीव्हीकेने (TVK) पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींच्या उमेदवारीला पाठिंबा दिला नाही तर विजय यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागेल, असा इशारा तामिळनाडू सरकारचे पर्यटनमंत्री आणि काँग्रेस आमदार राजेश कुमार यांनी दिला आहे. (Tamil Nadu Politics)
https://www.prahaar.in/2026/08/31/jnpa-emerges-as-the-worlds-fastest-growing-container-port/
तामिळनाडू सरकारमध्ये सध्या काँग्रेसचे दोन मंत्री आहेत. विजय यांच्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्याच मंत्र्याने मुख्य सत्ताधारी पक्ष असलेल्या टीव्हीके विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे टीव्हीके आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Tamil Nadu Politics)
विजय यांच्यासाठी प्रचार जोरात सुरू आहे. विजय आता पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे टीव्हीके सातत्याने म्हणत आहे. टीव्हीकेचे नेते ए. अर्जुन आणि शरद कुमार हे विजय यांच्यासाठी सातत्याने प्रचार करत आहेत. ‘विजय फॉर पीएम’ या घोषणेचे पोस्टर तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर टीव्हीके आणि काँग्रेस पक्षातील संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र आहे. (Tamil Nadu Politics)
https://www.prahaar.in/2026/08/31/ncp-core-committee-meeting-crucial-meeting-of-the-ncp-core-committee-at-devgiri-discussion-on-organizational-strengthening/
तामिळनाडूत बहुमताचा आकडा ११८ आहे पण टीव्हीकेकडे १०७ जागा आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे सरकार सुरक्षित आहे. पण काँग्रेस आणि टीव्हीके यांच्यातील संघर्षाची तीव्रता वाढली तर तामिळनाडू सरकारच्या स्थैर्याला धक्का बसण्याची शक्यता आहे. (Tamil Nadu Politics)