Home ब्रेकिंग न्यूज India-Nepal Flood Relief : भारताचे चौथे विमान ११ टन मदत सामग्री घेऊन नेपाळमध्ये पोहोचले

India-Nepal Flood Relief : भारताचे चौथे विमान ११ टन मदत सामग्री घेऊन नेपाळमध्ये पोहोचले

0
India-Nepal Flood Relief : भारताचे चौथे विमान ११ टन मदत सामग्री घेऊन नेपाळमध्ये पोहोचले
India's fourth aircraft arrived in Nepal with 11 tonnes of relief material.

काठमांडू : भारताचे चौथे विमान रविवारी मदत सामग्रीची चौथी खेप घेऊन काठमांडूमध्ये पोहोचले आणि आपत्तीग्रस्त देश नेपाळमधील लोकांच्या मदतीसाठी ही सामग्री येथील सरकारकडे सोपवण्यात आली. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एक्सवर लिहिले की, ११ टन मदत सामग्री घेऊन भारताचे चौथे विमान काठमांडूमध्ये पोहोचले आहे. हे विमान नेपाळमध्ये सुरू असलेल्या बचाव आणि मदत कार्यासाठी आवश्यक साहित्य आणि तांत्रिक क्षमता घेऊन आले आहे. यामध्ये सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी उपकरणांसोबत एक टनेल टेक्निकल टीम, डीएनए ॲनालिसिससाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची एक टीम तसेच ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, ताडपत्री, प्लास्टिक शीट आणि हायजीन किट यांसारखी मदत सामग्री समाविष्ट आहे.

उल्लेखनीय आहे की, नेपाळच्या रसुवा आणि आसपासच्या भागात भोटेकोशी नदीला २६ ऑगस्टच्या सकाळी अचानक आलेल्या विनाशकारी पुरात आतापर्यंत सुमारे ७२४ जणांचे मृतदेह सापडले आहेत आणि शेकडो लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांमध्ये परदेशी नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी यांचाही समावेश आहे. पुरामुळे तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

https://prahaar.in/2026/08/30/indian-standard-time-to-be-mandatory-across-the-country-from-march-2027/

तब्बल १०८ भारतीयांना वाचवण्यात यश

नेपाळच्या भोटेकोशी भागात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठी मदत आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत १०८ भारतीय नागरिकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर यापूर्वी बेपत्ता झालेल्या सुमारे ५० इतर भारतीयांशी पुन्हा संपर्क साधण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत ५९८ भारतीय नागरिक चीनमधून नेपाळमध्ये सुखरूप परतले आहेत. चीनच्या बाजूला असलेले जवळपास ९०० भारतीय सुरक्षित असून त्यांच्या संपर्कात आहेत. पण, २७५ हून अधिक भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे १२८ जण अजूनही बेपत्ता आहेत. भारताने आतापर्यंत भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांमार्फत नेपाळला अंदाजे ५७.५ टन मदत साहित्य पोहोचवले आहे. यामध्ये तात्पुरती निवारागृहे, तंबू, ब्लँकेट्स, औषधे, अन्न, स्वच्छता किट, सौर दिवे, पाण्याचे पंप आणि विद्युत उपकरणांचा समावेश आहे. भारताची प्रशिक्षित पथके आणि वैद्यकीय पथके मदतकार्यात गुंतली आहेत.