Home क्रीडा Budapest Squash Open : वेलावन सेंथिलकुमारची फायनलमध्ये धडक; बुडापेस्ट स्क्वॉश ओपनमध्ये हंगेरीच्या स्टारशी रंगणार लढत

Budapest Squash Open : वेलावन सेंथिलकुमारची फायनलमध्ये धडक; बुडापेस्ट स्क्वॉश ओपनमध्ये हंगेरीच्या स्टारशी रंगणार लढत

0
Budapest Squash Open : वेलावन सेंथिलकुमारची फायनलमध्ये धडक; बुडापेस्ट स्क्वॉश ओपनमध्ये हंगेरीच्या स्टारशी रंगणार लढत
Velavan Senthilkumar

बुडापेस्ट : भारताचा स्टार स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमारने PSA बुडापेस्ट स्क्वॉश ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करत शानदार कामगिरी केली आहे. शुक्रवारी झालेल्या रोमांचक उपांत्य सामन्यात सेंथिलकुमारने स्वदेशी वीर चोत्रानीचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दोन्ही भारतीय खेळाडूंमध्ये झालेला हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. सेंथिलकुमारने ९-११, ११-८, ११-७, १-११, १२-१० अशा गुणांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, निर्णायक पाचव्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच झुंज पाहायला मिळाली. अखेर सेंथिलकुमारने संयम राखत १२-१० असा गेम जिंकला आणि अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं.

https://prahaar.in/2026/08/28/sachin-pilgaonkar-and-madhurani-gokhales-kapuskonda-is-releasing-on-october-23/

या स्पर्धेत सेंथिलकुमारची कामगिरी सुरुवातीपासूनच प्रभावी राहिली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने मलेशियाच्या ईन यो एनजीचा ३-० असा पराभव करत मोठा धक्का दिला होता. त्यानंतर चोत्रानीविरुद्धच्या लढतीतही त्याने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला.

https://prahaar.in/2026/08/28/ahilyanagar-life-threatening-attack-on-bjp-district-vice-president-tension-in-nevasa/

दरम्यान, अंतिम फेरीत सेंथिलकुमारसमोर आता हंगेरीचा स्थानिक खेळाडू बालाझ फारकास याचं आव्हान असणार आहे. फारकासने उपांत्य फेरीत इजिप्तच्या मुस्तफा एलसिर्टीचा ३-० असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे सेंथिलकुमार आणि फारकास यांच्यात यापूर्वी दोन सामने झाले असून दोघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात दोघांमध्ये पुन्हा एकदा रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. आता भारतीय चाहत्यांच्या नजरा सेंथिलकुमारकडे लागल्या असून, बुडापेस्टमध्ये तो विजेतेपदाची ट्रॉफी उंचावतो का, याची उत्सुकता आहे.