Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
-
गाडी क्रमांक 01007 (CSMT ते मडगांव): ही विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ आणि १३.०९.२०२६ रोजी मध्यरात्री ००:४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:३० वाजता मडगांव येथे पोहोचेल.
-
गाडी क्रमांक 01008 (मडगांव ते CSMT): ही गाडी दिनांक ११.०९.२०२६ आणि १३.०९.२०२६ रोजी मडगांव येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
https://prahaar.in/2026/08/27/ed-raids-7-locations-in-mumbai-and-vadodara-action-taken-in-connection-with-the-bilpower-limited-loan-fraud-case/
प्रमुख थांबे
या दोन्ही गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील.
गाडीची संरचना
प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांमध्ये एकूण २२ डब्यांची रचना असणार आहे. यात २ वातानुकूलित तृतीय (AC 3-Tier), १२ शयनयान (Sleeper), ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.
https://prahaar.in/2026/08/27/yashs-toxic-creates-a-storm-at-the-box-office-crosses-the-100-crore-mark/
आरक्षण आणि तिकीट बुकिंग
गाडी क्रमांक 01007 या आरक्षित विशेष गाडीसाठी बुकिंग दिनांक २९.०८.२०२६ पासून सर्व पीआरएस (PRS) केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच, सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग ‘यूटीएस’ (UTS) प्रणालीद्वारे करता येणार असून, प्रवासी तिकीट बुकिंगसाठी ‘रेलवन ॲप’ देखील डाउनलोड करू शकतात. थांब्यांच्या वेळेबद्दल सविस्तर माहितीसाठी एनटीईएस संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.