उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला खांबाच्या कपारीवर कपडे वाळत घालताना दिसत असून, दोन पुरुष शेजारी बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, कोणतीही शिडी किंवा लिफ्ट नसतानाही तिथे टीव्ही, पाण्याचे हंडे आणि रोजच्या वापरातील इतर घरगुती सामान अगदी व्यवस्थित मांडलेले दिसत होते. ‘लिफ्ट नसलेला पहिला मजला’ अशा मिश्किल कॅप्शनसह हा व्हिडिओ नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत होता.
भारत ते नायजेरिया; चर्चा अन् दाव्यांचे पेव
फ्लाईओवर के पिलर में बस गई पूरी गृहस्थी, वीडियो देखकर लोग हैरान! 😂
बाकी सब तो ठीक है, लेकिन सबसे बड़ा सवाल यही है कि ये परिवार ऊपर पहुंचा कैसे होगा? 😂😂😂
ना ऊपर जाने के लिए कोई सीढ़ी दिखाई दे रही है और ना ही कोई दूसरी व्यवस्था। फिर भी फ्लाईओवर के पिलर के खाली हिस्से में… pic.twitter.com/kQ4Rt3Ul0J
— Dr. Dileep Maurya (@drdileepjnu) August 24, 2026
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरुवातीला तो भारतातील असल्याचे सांगून देशातील गरिबीवर भाष्य केले जात होते. परंतु, व्हिडिओतील गाड्यांचे मॉडेल्स आणि लोकांचा पेहराव यावरून काही युजर्सनी शंका उपस्थित केली. त्यानंतर एआय टूल ‘ग्रोक’च्या (Grok) हवाल्याने हा व्हिडिओ नायजेरियातील लागोस शहरातील असल्याचा आणि तिथल्या घरांच्या टंचाईचा परिणाम असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, स्थानिक नायजेरियन युजर्सनी असा कोणताही प्रकार प्रत्यक्ष घडला नसल्याचे सांगत हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.
https://prahaar.in/2026/08/25/onion-prices-up-59-govt-ramps-up-kanda-express-supplies-to-cool-market/
फॅक्ट चेक अन् एआयचा (AI) बनावट खेळ
या व्हायरल क्लिपची तांत्रिक तपासणी केली असता एक मोठे सत्य समोर आले. एआय डिटेक्टर्सद्वारे तपासणी केली असता, हा व्हिडिओ ९७ टक्के एआय-निर्मित (AI-Generated) असल्याचे सिद्ध झाले. व्यावहारिकदृष्ट्या विचार केल्यास, शिडी, दोरी किंवा कोणत्याही साधनांशिवाय इतक्या उंच खांबावर टीव्हीसारखे जड सामान आणि पाण्याचे हंडे नेणे निव्वळ अशक्य आहे. मूळ चित्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फेरफार केला गेला आणि हा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला.
डोळ्यांवर सहज विश्वास ठेवू नका!
सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) सर्रास वापर करून हुबेहूब वाटणारे काल्पनिक व्हिडिओ बनवणे अत्यंत सोपे झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर डोळे विस्फारून टाकणारे किंवा थक्क करणारे व्हिडिओ दिसल्यास त्यावर लगेच विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल. डोळ्यांनी पाहिलेली प्रत्येक गोष्ट खरीच असेल असे नाही, हेच या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.