Home ब्रेकिंग न्यूज Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Director who made Ajay Devgn a star passes away; Kuku Kohli breathes his last at the age of 77

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते कुकू कोहली यांचे मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे जवळचे मित्र आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिली. अशोक पंडित यांनी ‘एचटी सिटी’ला सांगितले की, कुकू कोहली यांना कोणताही गंभीर आजार नव्हता आणि त्यांना अचानक मोठा हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी ते पूर्णपणे धडधाकट असल्याचेही पंडित यांनी सांगितले. कुकू कोहली हे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (IFTDA) सरचिटणीसही होते.

https://prahaar.in/2026/08/25/three-suspects-arrested-in-shopian-jammu-and-kashmir-hand-grenades-and-posters-seized/

मात्र, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहली यांच्यावर आदल्या दिवशी रुग्णालयात उपचाराची प्रक्रिया करण्यात आली होती आणि स्टेंटही बसवण्यात आला होता. त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता; मात्र त्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्यांचे निधन सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाले. कुकू कोहली यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ १९९१ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अजय देवगणने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटाला मोठे व्यावसायिक यश मिळाले आणि अजय देवगणच्या कारकिर्दीला दमदार सुरुवात झाली.

https://prahaar.in/2026/08/25/8-8-billion-mega-plan-for-fuel-production/

यानंतर कुकू कोहली यांनी ‘कोहराम’, ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘जुल्मी’, ‘अनारी नंबर 1’ आणि ‘ये दिल आशिकाना’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘सुहाग’मध्ये अजय देवगण आणि अक्षय कुमार पहिल्यांदा एकत्र पडद्यावर दिसले. त्यांचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट ‘वो तेरा नाम था’ २००४ मध्ये प्रदर्शित झाला. कुकू कोहली यांच्या पश्चात पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी तसेच पहिल्या पत्नी रीटा कोहली यांच्यापासून झालेल्या पूजा आणि करिश्मा या दोन मुली आहेत. जानेवारी २०२६ मध्ये ‘ये दिल आशिकाना’च्या पुनर्प्रदर्शनाबद्दल बोलताना नव्या पिढीला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या अचानक निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.