Home ताज्या घडामोडी donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

0
donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर कार्यालयापर्यंत सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतराच्या मार्गावर ही शर्यत झाली. अनेक गाढवगाड्यांनी यात सहभाग घेतला. शर्यतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, या अनोख्या स्पर्धेची नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

https://prahaar.in/2026/08/22/26-11-mumbai-attack-hafiz-saeed-trial-in-absentia-in-india-against-six-pakistani-accused-including-hafiz-saeed-legal-process-underway/

कराचीच्या लयारी परिसरातील ही शर्यत जुन्या लोकपरंपरेचा भाग मानली जाते. या परंपरेचा इतिहास १८व्या शतकापर्यंत जात असल्याचे सांगितले जाते. वसाहतवादी काळात मच्छीमारांनी गाढवगाड्यांच्या शर्यतीला सुरुवात केल्याचे मानले जाते. त्यानंतर लयारीतील रहिवाशांनी ही परंपरा अनेक दशकांपासून जपली आहे. ही स्पर्धा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, कराचीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीशी जोडलेली आहे. ट्रेडिशनल स्पोर्ट्स अँड गेम्स पाकिस्तान असोसिएशननुसार, लयारीतील नागरिकांनी हा पारंपरिक खेळ आजही जिवंत ठेवला आहे.

https://prahaar.in/2026/08/21/trial-proceedings-begin-in-absentia-against-six-pakistani-terrorists-involved-in-the-26-11-attacks/

शर्यतीसाठी गाढवांची विशेष तयारी केली जाते. प्रामुख्याने तरुण गाढवांची निवड करून त्यांना पौष्टिक खाद्य आणि योग्य देखभाल दिली जाते. हरभरा, शेंगदाणे यांसारखे खाद्य देण्याबरोबरच शर्यतीसाठी हलक्या गाढवगाड्या तयार केल्या जातात.

https://prahaar.in/2026/08/20/pakistan-high-commission-in-delhi-action-taken-against-unauthorized-structures-outside-the-pakistan-high-commission-in-delhi-barricades-and-traffic-bollards-removed/

आर्थिक अडचणी आणि बदलत्या काळातही ही परंपरा सुरू राहावी यासाठी कराची प्रशासनाने शर्यतीला पाठिंबा दिला आहे. कराचीच्या आयुक्तांनी ही स्पर्धा आता दरवर्षी स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लयारीच्या या पारंपरिक शर्यतीला अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.