Home ताज्या घडामोडी Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

0
Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम नगरच्या मॉडर्न बेकरी जंक्शन परिसरात ही घटना घडली.

https://prahaar.in/2026/08/21/heart-wrenching-parents-die-while-trying-to-save-their-son-tragedy-in-chhatrapati-sambhajinagar-leaves-everyone-devastated/

गुरांसाठी गोठ्यात पाण्याची टाकी बांधली होती. दोन मुलं शाळेत जाण्याऐवजी पोहण्यासाठी गोठ्यातल्या टाकीत उतरली. पण खोलीचा अंदाज आला नाही आणि पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू झाला. मृत मुलांची नावं झैब पटेल (१५ वर्षे) आणि नखीब पटेल (१३ वर्षे) अशी आहेत. झैब हा दहावीत तर नखीब नववीत शिकत होता. पोलीस कायद्यानुसार पुढील कारवाई करत आहेत.