अभिनेत्रींसारखी चमकदार, डागविरहित आणि तजेलदार त्वचा मिळावी अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. यासाठी अनेकजण महागडे प्रॉडक्ट्स किंवा स्किन ट्रीटमेंट्सचा सहारा घेतात; पण तरीही म्हणावा तसा फरक दिसून येत नाही. बॉलिवूड आणि ग्लॅमर जगतातील अभिनेत्री केवळ आहारावरच नव्हे, तर एका अत्यंत सोप्या आणि नैसर्गिक उपचारावर विश्वास ठेवतात, तो म्हणजे ‘आइस वॉटर फेशिअल’ (Ice Water Facial).
https://prahaar.in/2026/08/20/which-are-the-10-oldest-countries-in-the-world-there-is-no-single-answer-to-this-in-history/
काय आहे आइस वॉटर फेशिअल ?

एका मोठ्या भांड्यात बर्फ आणि गार पाणी घेऊन त्यात ५ ते १० सेकंदांसाठी चेहरा बुडवून ठेवणे किंवा सुती कपड्यात बर्फ गुंडाळून चेहऱ्यावर ३ ते ४ मिनिटे हलक्या हाताने मालिश करणे, याला आइस वॉटर फेशिअल म्हणतात. हा अत्यंत सोपा उपाय बाजारातील रासायनिक घटकांनी भरलेल्या महागड्या क्रीम्सपेक्षा कितीतरी पटीने प्रभावी मानला जातो.
चेहऱ्यावर बर्फ वापरण्याचे ५ प्रमुख फायदे :

सूज आणि पफीनेस कमी होतो : सकाळी उठल्यानंतर अनेकदा चेहरा फुगलेला दिसतो किंवा डोळ्यांखाली सूज आलेली असते. बर्फाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे ही सूज तात्काळ ओसरते.
मेकअप राहतो दीर्घकाळ टिकणारा : कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी किंवा मेकअप करण्याच्या १० मिनिटे आधी चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास त्वचा मऊ होते. यामुळे मेकअपचा पॅच पडत नाही आणि तो जास्त वेळ टिकून राहतो.
अतिरिक्त तेल आणि मुरुमांवर नियंत्रण : तुमची त्वचा जास्त तेलकट असेल, तर बर्फाचा मसाज अत्यंत उपयुक्त ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील ओपन पोर्स (खुले छिद्र) लहान होतात आणि अतिरिक्त तेल निर्मिती रोखली जाते.

त्वचेचा सैलपणा कमी होतो : वाढत्या वयानुसार त्वचा सैल पडू लागते. नियमितपणे बर्फाने चेहऱ्यावर मालिश केल्यास त्वचेतील घट्टपणा टिकून राहतो आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
डार्क सर्कल्स आणि थकवा दूर होतो : रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांभोवती बर्फाने हलका मसाज केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark Circles) हळूहळू कमी होतात आणि थकलेला चेहरा क्षणात फ्रेश दिसू लागतो.
टीप : ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. जर तुमची त्वचा अत्यंत संवेदनशील (Sensitive) असेल किंवा त्वचेची काही ॲलर्जी असेल, तर हा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.