मुंबई : राज्यातील बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसीमधील नोंदणी तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे.
https://prahaar.in/2026/08/18/snakebite-declared-a-notified-disease-treatment-system-to-be-strengthened-health-minister-prakash-abitkar/
३ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यात यावी, यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. मात्र, होमिओपॅथी डॉक्टरांच्या मेडिकल कौन्सिलमधील समावेशाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि सेंट्रल मार्ड (मार्ड) या एलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता. या मुद्द्यावरून वैद्यकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होऊन आंदोलनेही झाली होती.
https://prahaar.in/2026/08/18/uproar-over-alleged-10000-crore-ponzi-scam-major-ed-crackdown-raids-in-mumbai-and-bhopal-assets-worth-30-crore-frozen/
दोन्ही बाजूंच्या भूमिका आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी प्रशासनाने मध्यस्थीचा मार्ग अवलंबला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, सध्याचे वातावरण निवळेपर्यंत आणि नोंदणीची योग्य कार्यपद्धती निश्चित होईपर्यंत ही प्रक्रिया थांबवणे आवश्यक आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता संपूर्ण वैद्यकीय वर्तुळाचे लक्ष उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.