डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्धचा कसोटी सामना बांगलादेशने नऊ विकेट राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच हरवण्याची किमया बांगलादेशने साधली. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला बांगलादेशचा हा दुसरा विजय आहे.
https://prahaar.in/2026/08/16/ind-vs-sl-test-match-rain-continues-to-play-a-part-all-eyes-on-the-outcome-of-the-galle-test/
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणे ऑस्ट्रेलियाला भोवले, त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद १९८ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद २८४ धावा केल्या तर बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद ४२६ आणि निर्णायक डावात एक बाद ५७ धावा करून विजय मिळवला. सुरुवातीलाच घेतलेल्या २८८ धावांच्या आघाडीच्या जोरावर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना सहज जिंकला.
https://prahaar.in/2026/08/15/major-decision-regarding-the-timing-of-the-india-sri-lanka-test-at-what-time-will-sundays-play-begin-in-the-galle-test/
बांगलादेशकडून हसन महमूदने पहिल्या डावात १७ षटकांत ५५ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना बाद केले. त्याने दुसऱ्या डावात १९ षटकांत ५६ धावा देत ३ जणांना बाद केले. दोन्ही डावात मिळून नऊ फलंदाजांना बाद करणारा हसन महमूद सामनावीर झाला.
https://prahaar.in/2026/08/15/the-phone-number-is-from-kolkata-the-police-will-take-action-sourav-gangulys-reaction-to-the-death-threat/
पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये आणि ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात चौथे स्थान कायम राखले आहे. पण बांगलादेशच्या विजयाची टक्केवारी ६६.६७ वर पोहोचली आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या (विजयाची टक्केवारी ७७.७८), दक्षिण आफ्रिका दुसऱ्या (विजयाची टक्केवारी ७५), न्यूझीलड तिसऱ्या (विजयाची टक्केवारी ७२.२२), बांगलादेश चौथ्या (विजयाची टक्केवारी ६६.६७) आणि भारत पाचव्या (विजयाची टक्केवारी ४८.१५) स्थानावर आहे.