Home क्राईम Zeeshan Siddique : ‘मला येणाऱ्या धमक्यांमागे बिल्डर लॉबीचा हात’

Zeeshan Siddique : ‘मला येणाऱ्या धमक्यांमागे बिल्डर लॉबीचा हात’

0
Zeeshan Siddique : ‘मला येणाऱ्या धमक्यांमागे बिल्डर लॉबीचा हात’

मुंबई : परदेशात असताना पोर्तुगालच्या नंबरवरून मिळालेल्या व्हॉईस नोटद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार झिशान सिद्दीकी यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आपल्याला येणाऱ्या या धमक्यांमागे एका विशिष्ट ‘बिल्डर लॉबी’चा हात असून, न्यायालयातील याचिकेची तारीख जवळ आली की अशा धमक्या दिल्या जात असल्याचे सांगितले. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/08/15/what-exactly-happened-at-the-congress-headquarters-while-vande-mataram-was-being-played-who-will-face-punishment-now/

झिशान सिद्दीकी म्हणाले की, परदेशात असताना पोर्तुगालच्या नंबरवरून आलेल्या व्हॉईस नोटमध्ये ‘वडिलांप्रमाणेच तुलाही गोळ्या घालून ठार मारू’, अशी धमकी देण्यात आली. यापूर्वीही सोशल मीडियावर धमक्या मिळाल्या होत्या. याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना दिली असून वांद्रे पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. “माझ्या आईने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेची सुनावणी जवळ आली की नेमक्या त्याच वेळी धमक्यांचा पाऊस पडतो. ही निव्वळ योगायोगाची बाब नसून भित्री बिल्डर लॉबी आम्हाला घाबरवण्यासाठी हे कारस्थान रचत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

https://prahaar.in/2026/08/15/intellectual-naxalism-is-more-dangerous-than-the-gun-sonia-gandhis-displeasure-over-vande-mataram-is-an-example-of-this-cerebral-naxalism-chief-minister-devendra-fadnavis/

वडिलांच्या (बाबा सिद्दीकी) हत्येच्या तपासाच्या दिशेवर मी आणि माझे कुटुंब अजिबात समाधानी नाही. आम्ही पोलिसांना संशयितांची जी नावे दिली होती, त्यांची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. हत्येपूर्वी वडिलांशी शेवटच्या काही दिवसांत कुणाचा संवाद झाला होता, याचा शोध पोलीस का घेत नाहीत? पोलीस नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

https://prahaar.in/2026/08/15/mumbra-to-soon-be-renamed-mumbradevi-special-campaign-to-make-the-states-coastline-jihad-free-minister-nitesh-rane-hints/

माझी सुरक्षा का काढली?

दररोज नव्या धमक्या येत असताना नोव्हेंबर महिन्यात माझी सुरक्षा अचानक का काढण्यात आली? पूर्वी माझ्यासोबत ८ पोलीस अधिकारी आणि इमारतीभोवती २२ पोलिसांचा पहारा होता. परंतु, आईने न्यायालयात रिट याचिका दाखल केल्यानंतर दोनच दिवसांत ही सुरक्षा हटवण्यात आली. लोकप्रतिनिधी असलेल्या आमदाराला जर राज्यात सुरक्षित वाटत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच वडिलांच्या खुन्यांचा पर्दाफाश होणार असेल, तर मी १०० गोळ्या खायला तयार आहे, असेही ते म्हणाले. या संघर्षाच्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी नमूद केले.