चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता भीषण दुर्घटना घडली. अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा बोगद्यात शिरल्याने आत काम करणारे कामगार अडकले. प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी सुमारे २२ कामगार बोगद्यात होते.
https://prahaar.in/2026/08/14/major-leak-in-the-mumbai-3-water-pipeline-near-teen-hath-naka-thane-repair-work-underway-on-a-war-footing/
भूस्खलनानंतर बोगद्यात पाणी आणि मलब्याचा जोरदार प्रवाह शिरल्याने बचावपथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. NDRF, SDRF, पोलीस, ITBP, लष्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी तातडीने बचावमोहीम सुरू केली. पाण्याची पातळी वाढल्याने आणि बोगद्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने बचावकार्य अत्यंत कठीण बनले आहे.
ताज्या माहितीनुसार, १९ कामगारांना बोगद्यातून बाहेर काढून गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर काही कामगारांवर उपचार सुरू आहेत. एका गंभीर जखमी कामगाराला पुढील उपचारासाठी श्रीनगर येथील बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान, २ कामगार अद्याप बोगद्यात अडकले असून त्यांचा शोध सुरू आहे.
https://prahaar.in/2026/08/13/work-on-the-mumbai-goa-highway-will-be-completed-by-october/
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत सर्व यंत्रणांना बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्याचे निर्देश दिले आहेत. बेपत्ता कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावपथकांकडून अथक प्रयत्न सुरू आहेत.