मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर आणि उत्तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/08/12/plastic-notes-of-%e2%82%b910-and-%e2%82%b920-to-be-introduced-into-circulation/
मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच दक्षिण कोकण आणि गोव्यात निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
https://prahaar.in/2026/08/12/nine-free-trade-agreements-have-boosted-indian-industries-and-businesses/
मुंबईत आकाश ढगाळ राहण्याची आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३१ तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/08/12/a-modern-facility-equipped-with-all-amenities-will-be-constructed-for-the-fishing-community-minister-nitesh-rane/
कसे असेल गुरुवार १३ ऑगस्टचे हवामान ?
कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात गुरुवारी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल आणि निवडक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. पुण्यात आकाश ढगाळ राहण्याची आणि हलक्या सरींची शक्यता आहे.