Home ब्रेकिंग न्यूज Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

0
Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर सुरक्षा यंत्रणेने प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला. या कारवाईत हल्ला करणाऱ्या बंदुकधाऱ्याचा मृत्यू झाला.

https://prahaar.in/2026/08/11/court-sentences-former-syrian-president-bashar-al-assad-to-death/

सुरक्षा यंत्रणेच्या गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मुहम्मद हुसेन असे आहे. मुहम्मद हुसेनने केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाचा एक जवान जखमी झाला.

https://prahaar.in/2026/08/11/is-iran-responding-to-us-airstrikes-with-hacking-is-iran-plotting-to-kill-us-citizens-through-brutal-means/

पोलिसांनी मुहम्मद हुसेनच्या मृतदेहाची आणि त्याच्याकडे असलेल्या सामानाची कसून झडती घेतली. या झडतीत काही कागदपत्रे आणि मोबाईल सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या साहित्याच्या मदतीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://prahaar.in/2026/08/11/massive-earthquake-hits-colombia-powerful-7-4-magnitude-quake-132-dead-situation-critical/

हल्लेखोर मुहम्मद हुसेन हा पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनवा प्रांतातला रहिवासी आहे. तो पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचा सक्रीय सदस्य होता. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.