वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात २८ फेब्रुवारी २०२६ पासून अधिकृतरित्या संयुक्त आघाडी उघडली. हवाई हल्ले करत अमेरिकेने इराण विरोधात युद्ध पुकारले. इराणकडे असलेले अणुबॉम्ब आणि इतर संहारक शस्त्रं नष्ट करून जगाचे कल्याण करणार अशा स्वरुपाची भूमिका मांडत जागतिक शांततेसाठी अमेरिकेने इराण विरोधात युद्ध सुरू केले.
https://prahaar.in/2026/08/11/massive-earthquake-hits-colombia-powerful-7-4-magnitude-quake-132-dead-situation-critical/
अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना उत्तर म्हणून इराणने आखाती देशांतील अमेरिकेच्या तळांवर हवाई हल्ल्यांचा प्रयत्न केला. तसेच इराणने होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात मालवाहक जहाजांची कोंडी करायला सुरुवात केली. इराणच्या परवानगीशिवाय एकही जहाज सामुद्रीधुनी ओलांडू शकणार नाही, अशी ठाम भूमिका इराणने घेतली. इराणने केलेली कोंडी फोडण्याचा अमेरिकेने वारंवार प्रयत्न केला. पण अमेरिकेचे प्रयत्न वारंवार अपयशी झाले. कोंडी फोडण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी अमेरिकेने इराणवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्रता वाढवली. या हल्ल्यांमुळे इराणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांतील निवडक तेलविहिरी, विमानतळ, पाणी शुद्धीकरण प्रकल्प यांना लक्ष्य केले. काही दिवसांनंतर इराणने अमेरिकेला चकीत करत सायबर हल्ले सुरू केले. या हल्ल्यांमुळे त्रस्त असलेल्या अमेरिकेला अद्याप त्यावर ठोस उपाय करणे शक्य झालेले नाही. यामुळेच सायबर हल्ल्यांकरवी अमेरिकेच्या नागरिकांना हाल हाल करून मारण्याचा इराणचा डाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
https://prahaar.in/2026/08/11/preparations-for-august-15-gain-momentum-pm-modi-urges-participation-in-the-har-ghar-tiranga-campaign/
अमेरिकेत पाणी शुद्धीकरण, भूजल उपसा केंद्र, पाणी पुरवठा यंत्रणा, मलनिःसारण प्रकल्प या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संगणकीकरण करण्यात आले आहे. इराणने या नेटवर्कमध्येच घुसखोरी करून सायबर हल्ले सुरू केले आहेत. यामुळे अमेरिकेतील नागरिकांचे शुद्ध पाण्याअभावी हाल होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस मिनेसोटा राज्याने किमान ३० शहरांच्या पाणीपुरवठा प्रणालींवर सायबर हल्ला झाल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर, एफबीआयने इशारा दिला की सायबर गुन्हेगारांनी किमान सात राज्यांच्या पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रणालींमध्ये घुसखोरी केली होती. त्यानंतर, जॉर्जिया, न्यू जर्सी आणि साउथ डकोटा यांसह अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्येही अशाच प्रकारचे सायबर हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या. सायबर हल्ल्यांमुळे अमेरिकेतील पाणीपुरवठा सेवांवर परिणाम झाला आणि अत्यावश्यक सार्वजनिक सेवांमधील त्रुटी उघड झाल्या.
https://prahaar.in/2026/08/11/sheikh-hasina-developments-in-bangladesh-picking-up-pace-raw-chief-meets-prime-minister-tariqs-security-advisors-is-the-path-clear-for-sheikh-hasinas-return/
अमेरिकेत १५.२ दशलक्ष सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आणि १६ हजारांपेक्षा जास्त सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहेत. देशातील शहरांना आणि गावांना तलाव, जलाशय, नद्या किंवा भूगर्भातील पाण्याच्या स्रोतांमधून पाणी मिळते.
विजेचा वापर करून संगणकीकृत यंत्रणेच्या मदतीने अमेरिकेत पाणी शुद्धीकरण, भूजल उपसा केंद्र, पाणी पुरवठा यंत्रणा, मलनिःसारण प्रकल्प चालवले जातात. सायबर हल्ल्यांमुळे या प्रकल्पांच्या कामावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
हॅकर्स थेट इंटरनेटशी जोडलेल्या प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर्सना (पीएलसी) लक्ष्य करत आहे. ही अशी उपकरणे आहेत जी जलप्रणाली आणि इतर औद्योगिक प्रकल्पांना एकमेकांशी यांत्रिक पद्धतीने जोडते. नेमकी हीच यंत्रणा इराण पुरस्कृत सायबर हल्ल्यांमुळे वारंवार ठिकठिकाणी विस्कळीत होऊ लागली आहे.
https://prahaar.in/2026/08/11/major-changes-to-youtubes-rules-monetization-is-set-to-become-even-harder-for-new-creators/
पीएलसी पाण्याचा दाब, पाण्यात मिसळलेल्या रसायनांचे प्रमाण आणि इतर महत्त्वाच्या मापदंडांवर लक्ष ठेवतात. ही प्रक्रिया पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे का ? याची खात्री करण्यासाठी केले जाते. पालिकेचे कर्मचारी डॅशबोर्डद्वारे हे नियंत्रक चालवतात. हे डॅशबोर्ड वायर्ड नेटवर्क, रेडिओ किंवा मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्शनद्वारे चालतात. इराणच्या सायबर टीम सतत अशी इंटरनेट नेटवर्क शोधून त्यांच्या माध्यमातून अमेरिकेच्या पाण्याशी संबंधित यंत्रणांवर हल्ले करत आहे. यासाठी इराणच्या सायबर टीम सतत अमेरिकेत कार्यरत कंपन्यांचे कंट्रोलर्स, डॅशबोर्ड्स किंवा रिमोट अॅक्सेस सर्व्हिसेस यावर लक्ष ठेवून आहे. सिस्टममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी डीफॉल्ट किंवा चोरलेल्या पासवर्डचा, दुरुस्त न केलेल्या सुरक्षा त्रुटींचा किंवा चुकीच्या पद्धतीने सेट केलेल्या रिमोट अॅक्सेस सेवांचा हल्लेखोर वापर करत आहेत. सायबर हल्ले करून सतत अमेरिकेच्या यंत्रणांचा कारभार विस्कळीत केला जात आहे.
इराणच्या सायबर हल्ल्यांना आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या तज्ज्ञांना अद्याप ठोस उपाय सापडलेला नाही. यामुळे इराणचे सायबर तज्ज्ञ हॅकिंग करून अमेरिकेला शुद्ध पाण्यापासून वंचित करण्याची भीती सातत्याने व्यक्त होऊ लागली आहे.